शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हालाही बोलवा ना, आम्ही सुद्धा सिनेमे पाहतो"; संजय राऊतांचे भाजपला चिमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:07 IST

Sabarmati Report Movie Special Screening: 'द साबरमती रिपोर्ट'चे स्पेशल स्क्रीनिंग संसदेच्या बाल योगी सभागृहात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएच्या मंत्री खासदारांनी हा चित्रपट बघितला.

Sanjay Raut Sabarmati Report Movie: 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला असून, सोमवारी संसदेच्या बालयोगी सभागृहात चित्रपट दाखवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, एनडीएचे खासदार हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटे काढले.  

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले. 

संसदेच्या बाल योगी सभागृहात 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या मंत्री आणि खासदारांनी हा चित्रपट बघितला. याबद्दल खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. 

संभल फाईलही काढतील, राऊतांची टीका

संजय राऊत म्हणाले, "साबरमती, काश्मीर फाईल, ताश्कंद फाईल... उद्या संभल फाईल काढतील. मग महाराष्ट्र फाईल काढतील. या सगळ्या फाईल हेच तयार करतात आणि त्यावर सिनेमे बनवण्यासाठी स्वतःच पैसे देतात. स्वतःच प्रेक्षक पाठवतात. अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर काढतील. इंदिरा गांधींवर सिनेमा एक काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतील."

"मणिपूर फाईल काढा. महाराष्ट्रात जो खेळ झाला, संविधानाची हत्या करण्याचा; त्यावर सिनेमा काढा. आम्ही काढणार आहोत. बहुतेक एकनाथ शिंदे काढतील. त्यांनी धर्मवीर दोन, तीन, चार... आता किती काढताहेत पाच-पंचवीस मला माहिती नाही. तर असे सिनेमे ते बघतात, काढतात. आणि फक्त एनडीएच्या लोकांनाच बघायला बोलवतात", असा टोला संजय राऊतांनी लगावला. 

'आम्हीही सिनेमाप्रेमी, आम्हाला सिनेमा बघायला बोलवा'

संजय राऊत पुढे म्हणाले, "आम्हालाही बोलवा ना. आम्हीही सिनेमाप्रेमी आहोत. पाहू ना आम्ही. त्याचं विश्लेषण करू. असे आहे की, त्यामध्ये काही तांत्रिक चुका आहे का? कलाकार कुठे चुकले आहेत का? उत्तम कुणी काम केलंय का? आम्ही सुद्धा सिनेमे पाहतो. सिनेमे काढतो. कथानके लिहितो. आम्ही लेखक आहोत, साहित्यीक आहोत", अशी टीका संजय राऊतांनी केली. 

"आम्हाला कळतं, साहित्य कला. महाराष्ट्र हा कलेचा भोक्ता आहे, पण आम्हाला बोलवणार नाही. हे सगळे टाळ्या वाजवणारे चमचे, उसासे सोडणारे लोक बोलवणार... क्या बात है, वाह वाह वाह.... मणिपूरला जा. मणिपूरवर सिनेमा काढा. कश्मिरी पंडित ज्या परिस्थितीत राहताहेत अजून त्यांची फाईल उघडा", अशा शब्दात राऊतांनी भाजपवर हल्ला चढवला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाParliamentसंसद