शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

राफेल करार कोणासाठी? हवाई दलासाठी की गाळ्यात गेलेल्या कंपनीसाठी?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 08:41 IST

राफेल करारवरुन शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका

मुंबई: काँग्रेसला लष्कराचे बळकटीकरण नको आहे असे नेहमीचेच आरोप पंतप्रधान करतात व दुसर्‍याच दिवशी राफेल करारात मोदी यांना व्यक्तिगत रस किती टोकाचा होता याबाबतचे कागदोपत्री पुरावे उघड होतात, यास काय म्हणायचे?, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीराफेल डीलवरुन सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत असताना शिवसेनेनंदेखील मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल करार हा हवाई दलाच्या बळकटीकरणासाठी झाला की एका गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला?, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला.राफेल डीलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधींनी सातत्यानं केला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. त्यावेळीही संसदेत शिवसेनेनं भाजपाला अडचणीत आणलं होतं. राफेल विमान खरेदी प्रकरणात पारदर्शकता असेल, तर मग संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्यास काय हरकत आहे, असं म्हणत शिवसेनेनं मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. काल 'द हिंदू' वृत्तपत्रानं राफेल डीलमध्ये मोदींनी समांतर वाटाघाटी केल्या. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाच्या बोलणीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं. मोदींच्या या हस्तक्षेपाचा संरक्षण मंत्रालयानं निषेध केल्याची कागदपत्रंदेखील प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले. त्यानंतर आज शिवसेनेनं सामनामधून मोदी सरकारवर शरसंधान साधलं. 'जाहीर सभेत तावातावाने बोलावे व झोडपाझोडपी करावी अशाच थाटाचे भाषण आपले पंतप्रधान मोदी संसदेतही करतात. सत्ताधारी पक्षाचे लोक पंतप्रधानांच्या प्रत्येक वाक्यावर बाके बडवीत असतात. पण त्यामुळे संसदेच्या थोर परंपरेत काही भर पडत आहे काय? पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काँग्रेसला ठोकून काढले. चांगलीच सालटी काढली. देशाचे हवाई दल बळकट होऊ नये यासाठीच राफेल करारावर सातत्याने टीका सुरू असल्याचा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेसला लष्कराचे बळकटीकरण नको आहे असे नेहमीचेच आरोप पंतप्रधान करतात व दुसर्‍याच दिवशी राफेल करारात मोदी यांना व्यक्तिगत रस किती टोकाचा होता याबाबतचे कागदोपत्री पुरावे उघड होतात, यास काय म्हणायचे? राफेल करार हा हवाई दलाच्या बळकटीकरणासाठी झाला की एका गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांकडून अपेक्षित आहे,' असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 'राफेलच्या व्यवहारात थेट आपले मोदीच ‘डील’ करीत होते. संरक्षणमंत्री, संरक्षण सचिव वगैरे प्रमुख मंडळीना या व्यवहारापासून लांब ठेवले गेले. राफेलच्या किमती ठरवण्यापासून ते हे कंत्राट कुणाला द्यायचे याबाबतचे सर्व निर्णय मोदी यांनीच घेतले आहेत. त्यामुळे आरोप व टीकेचे धनी त्यांना व्हावेच लागेल. ‘चौकीदार चोर है’ हा नारा राहुल गांधी यांनी दिला व तो देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला. यास काँग्रेस जबाबदार नाही तर राफेल प्रकरणातली आता उघड झालेली लपवाछपवी कारणीभूत आहे. श्री. मोदी म्हणतात, “तुम्ही मोदींवर टीका करा, भाजपवर टीका करा, पण देशावर टीका करू नका.’’ याचा अर्थ मोदीभक्तांनीच समजावून सांगावा. संशयास्पद व्यवहार जो राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे त्यावर खुलासा मागणे ही देशावर टीका कशी काय होऊ शकते? देशात लोकशाही आहे व तिचे खच्चीकरण कोण करीत आहे? लोकशाही व न्याय व्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे व हा अधिकार नाकारणे म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेने मोदी सरकारचा समाचार घेतला.'साडेचार वर्षांपासून देशावर मोदींचे एकछत्री राज्य आहे. तरीही महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत प्रत्येक गोष्टीचे खापर काँग्रेसवर फोडणे हे स्वतःचे अपयश झाकण्यासारखे आहे. सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले? या प्रश्नाच्या फेर्‍यातून मोदी व त्यांचे सरकार सत्तेचा कालावधी संपत आला तरी बाहेर पडलेले नाही. लोकांनी त्यांना सत्ता दिली, पण सत्ता ही फक्त विरोधकांच्या नाड्या आवळण्यासाठीच वापरली गेल्याने सत्ताधार्‍यांना पुनःपुन्हा काँग्रेसवर टीका करावी लागत आहे. काँग्रेसने देश कमजोर केला हा मोदींचा आरोप मान्य आहे. काँग्रेसवाले चोर, लफंगे, भामटे व डाकू आहेत. प्रत्येक काँग्रेसवाल्यास भरचौकांत फासावर उलटे लटकवायला हवे. काँग्रेस ही शिवी आहे हे सर्व मान्य केले तरी राहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराबाबत विचारलेले प्रश्न कायम आहेत. पाचशे कोटींचे राफेल विमान सोळाशे कोटीस विकत घेण्यामागचा तर्क काय? व समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत देशाचा प्रत्येक नागरिक हा प्रश्न विचारीत राहील. राजकारणात तळे राखी तो पाणी चाखी हे मान्य, पण येथे समुद्रच गिळला जात आहे,' अशी घणाघाती टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस