“हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:40 PM2021-12-22T12:40:57+5:302021-12-22T12:41:42+5:30

शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडीने चौकशी केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली.

shiv sena sanjay raut criticized bjp and modi govt over ravindra waikar ed inquiry | “हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले

“हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले

Next

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. वायकर जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांच्या चौकशीने एकच खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. 

रवींद्र वायकर चौकशीला जातील आणि आपली भूमिका माडंतील. भाजपाच्या कार्यालयातून जर ईडीची सूत्रे हलत असतील तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आमची सहानुभूती असणाऱ्यांना असा त्रास होणार हे आम्ही गृहितच धरले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केली. 

हा सगळा प्रकार २०२४ पर्यंत, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल

जया बच्चन यांच्या सूनबाई आणि मुलाच्या बाबतीत आम्ही ऐकलं. जे जे सरकारविरोधात बोलतील, सरकारला प्रश्न विचारतील त्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांच्यासमोर उभे करुन अपमानित केले जाईल. त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जाईल हे सूत्र झाले आहे. हे २०२४ पर्यंत चालेल. त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यात जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. अलिबागमधील जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचाही उल्लेख किरीट सोमय्यांनी केला होता. किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी रवींद्र वायकर यांची चौकशी केल्याचे समजते. रवींद्र वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकते, असेही ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
 

Web Title: shiv sena sanjay raut criticized bjp and modi govt over ravindra waikar ed inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.