शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली राकेश टिकैत यांची भेट; संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 14:07 IST

गाझीपूर सीमेवर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली टिकैत यांची भेट

शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. तसेच खिळे सीमेवर ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला होता. तुम्ही अन्नदात्याला दहशतवादी म्हणता. पण तुमची वर्तणूक दहशतवाद्यांपेक्षा वरची आहे, असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिल्ली उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गाझीपूर येथे भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. आमचं शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनीशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारनं त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. हा कोणत्याही राज्याचा विषय नाही. हा देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. चर्चेत कोणतंही राजकारण येऊ देऊ नये," असं संजय राऊत यावेळी म्हणाले. यापूर्वीही सरकारवर साधला निशाणा "दिल्लीपेक्षा भारत-चीन सीमेवरील रस्त्यांवर सळ्या लावल्या असत्या, खिळे ठोकले असते, तर चीनी भारतात घुसले नसते," असा चिमटा राऊत यांनी यापूर्वी बोलताना केंद्र सरकारला काढला. "शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत तिरंग्याचा अपमान झाल्याचा मुद्दा भाजपकडून वारंवार उपस्थित करण्यात येतो. त्यालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. शेतकरी केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्यासाठीही आंदोलन करत आहेत. त्यांच्या लढ्याला बळ देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. हाच तिरंग्याचा सन्मान आहे," असं राऊत म्हणाले."दिल्लीत असताना आम्ही शेतकऱ्यांची भेट घेतली नाही, तर परमेश्वर आम्हाला माफ करणार नाही. शिवसेनेचं शिष्टमंडळ शेतकऱ्यांची भेट घेईल. कदाचित पोलीस आम्हाला अडवतील, अटक करतील, लाठ्या चालवतील किंवा मग गोळ्या घातल्या जातील. त्यापलीकडे सरकार काही करू शकत नाही," असं राऊत यापूर्वी म्हणाले होते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपrakesh tikaitराकेश टिकैतShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतArvind Sawantअरविंद सावंतdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेश