शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी हे उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतात व दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रॉनबाबत चिंता व्यक्त करतात' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 08:35 IST

"सरकारने निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली तरी लोकांची मानसिकता आता बंधने झुगारून उत्सव साजरे करण्याची आहे. नेत्यांच्या, पंतप्रधानांच्या सभा होतात मग आमच्या आनंदावर बंधने का लावता, हा त्यांचा सवाल"

ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर नववर्षापूर्वीच अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रतही रात्री ९ ते सकाळी ६ या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवरुन आता शिवसेनेने निशाणा साधला आहे. मोदी हेच वाराणसीपासून लखनौपर्यंत जाहीर सभा घेत आहेत. नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी केले पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतात व दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य खात्याच्या बैठका घेऊन चिंता व्यक्त करतात. कोरोनाविरोधातला लढा अद्याप संपलेला नाही, असे म्हणत शिवसेनेने जाहीर सभांवरुन टीकेचा बाण सोडला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून हल्लाबोल केला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रातही निदान रात्रीचे निर्बंध घालावेत यासाठी हालचाली सुरू आहेत. नाताळ, नवीन वर्ष यांच्या स्वागताच्या जल्लोषी पाटर्य़ा थांबविण्यासाठी सरकारने निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली तरी लोकांची मानसिकता आता बंधने झुगारून उत्सव साजरे करण्याची आहे. नेत्यांच्या, पंतप्रधानांच्या सभा होतात मग आमच्या आनंदावर बंधने का लावता, हा त्यांचा सवाल आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’चा हा प्रयोग प्रभावी ठरणारा असला तरी दिवसाची गर्दी अनिर्बंध राहिली तर तो फायद्याचा ठरणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या सभालग्न, समारंभ, पाटर्य़ा ओसंडून वाहू लागल्या व त्याहीपेक्षा ज्या चार-पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत तेथे आपले पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या गर्दीच्या सभा होत आहेत. त्या गर्दीत कोरोनाचे कोणतेही नियम किंवा निर्बंध पाळले जात नाहीत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांच्या सभांना आणि रोड शोंना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण शेवटी कोरोनाचे नियम पाळायलाच हवेत. अर्थात मोदी हेच वाराणसीपासून लखनौपर्यंत जाहीर सभा घेत आहेत. नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी केले पाहिजे. 

लढा संपलेला नाहीपंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतात व दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य खात्याच्या बैठका घेऊन चिंता व्यक्त करतात. कोरोनाविरोधातला लढा अद्याप संपलेला नाही. सतर्क आणि सावधान सतर्क आणि सावधान रहा अशा सूचना मोदी देतात. दिल्लीत गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यातील छायाचित्रात आपले पंतप्रधान वगळता सगळ्यांनीच ‘मास्क’ घातले आहेत.

पंतप्रधानांचे आरोग्यसुद्धा देशासाठी मोलाचे असल्याने त्यांनीही ‘सतर्क आणि सावधान रहा’ या स्वसंदेशाचे पालन केले पाहिजे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.  खरे तर देशात नेत्यांचे दौरे, जाहीर सभा, मेळावे, मोर्चे, संप सर्वकाही बिनधोक सुरू आहे, पण निर्बंधाच्या चरकात सामान्य जनताच पिळून निघते. अर्थात शेवटी दुसरा पर्याय तरी काय आहे?

नवा संसर्ग किती नियंत्रणात राहणार?महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी ‘टास्क फोर्स’ची बैठक घेतली व आपत्कालीन स्थिती उद्भवलीच तर सुसज्ज राहण्याचे आदेश सरकारी यंत्रणांना दिले. रुग्णालयात ऑक्सिजन, खाटांची सुविधा वाढविण्यात येईल. लसीकरणावर भर दिला जाईल. निर्बंध मोडून बाहेर येणाऱ्यांना पोलीस दंडुक्याने प्रसाद देतील हे खरे असले तरी या सगळ्यांतून नवा संसर्ग किती नियंत्रणात राहील? नाताळ, नवीन वर्ष यांच्या स्वागताच्या जल्लोषी पाटर्य़ा थांबविण्यासाठी सरकारने निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली तरी लोकांची मानसिकता आता बंधने झुगारून उत्सव साजरे करण्याची आहे. नेत्यांच्या, पंतप्रधानांच्या सभा होतात मग आमच्या आनंदावर बंधने का लावता, हा त्यांचा सवाल आहे.

न्यायालयाने राजकारणात पडू नयेउत्तर प्रदेशसह विविध राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा थांबविण्यात याव्यात, अशी विनंती अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हणे पंतप्रधान मोदी यांना केली. आताच्या परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलता येऊ शकतील का यावरही पंतप्रधानांनी विचार करावा, असे न्यायालयाने सुचवले आहे. न्यायालयाने जनतेच्या जिवाची चिंता व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे आभार; पण प. बंगालातील विधानसभा निवडणुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर उसळला होता तेव्हाच झाल्या होत्या.

पंतप्रधानांपासून गृहमंत्री शहांपर्यंत संपूर्ण ‘भाजप’ महामंडळ त्या वेळी मोठय़ा गर्दीचा देखावा उभा करीत होते. मग तेव्हा एखाद्या न्यायालयास लोकांची चिंता का वाटली नाही? उत्तर प्रदेशात कोणाच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने कोरोनाच्या नावाखाली ‘इलेक्शन कर्फ्यू’ लावण्याचा घोटाळा सुरू आहे काय? न्यायालयाने न्यायदानाचे काम करावे, राजकारणात पडू नये. कोरोनाशी लढण्याचे व पळवून लावण्याचे बळ देशाच्या पंतप्रधानांत आहे!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUttar Pradeshउत्तर प्रदेश