शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘रेल्वे कन्व्हेन्शन समिती’चे अध्यक्षपद शिवसेनेला?; गजानन कीर्तिकरांच्या नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 02:22 IST

अवजड उद्योग खाते दिल्यामुळे नाराज झालेली शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जड’ ठरू नये, यासाठी भाजपने त्यांना पुन्हा जवळ घेण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : अवजड उद्योग खाते दिल्यामुळे नाराज झालेली शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जड’ ठरू नये, यासाठी भाजपने त्यांना पुन्हा जवळ घेण्यास सुरुवात केली आहे. ‘रेल्वे कन्व्हेन्शन समिती’चे अध्यक्षपद शिवसेनेला देण्याबाबत भाजप विचार करीत असून, ज्येष्ठ शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची या पदी वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.कीर्तिकर महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात मंत्री होते. रेल्वेच्या स्थायी समितीचेही ते सदस्य आहेत. बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते भार्तुहरी मेहताब हे या समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. लोकसभा बरखास्त झाल्यावर समितीचा कार्यकाळ संपतो. त्यामुळे लवकरच नव्या समितीची घोषणा केली जाईल.रेल्वेला आर्थिक वर्षात झालेल्या फायद्यातील किती समभाग (डिव्हिडंट) केंद्राला द्यावा, हे ठरवण्याचे सर्वाधिकार या समितीला असतात. अर्थात आता रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जात नाही. त्यामुळे रेल्वेच्या नफा-तोट्यावर केंद्रीय अर्थ मंत्रालयाचेच नियंत्रण असेल.अशा वेळी रेल्वे कन्व्हेन्शन समितीला फारसे महत्त्व उरणार नाही, अशी माहिती लोकसभा सचिवालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. मात्र रेल्वेच्या पायाभूत सुविधांमधील बदल, रेल्वे डब्यांमध्ये सुधारणा सुचविण्याचे अधिकार या समितीकडे कायम राहतील. समितीच्या शिफारसी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सरकार गांभीर्याने घेते. ब्रिटिशांच्या काळापासून ही समिती अस्तित्वात आहे.१९४३ पासून समिती अस्तित्वातडिसेंबर २०१९ मध्ये समितीने काही रेल्वे स्थानके, रेल्वे गाड्यांची पाहणी केली होती. बॉयो टॉयलेटच्या दुरवस्थेवर समितीने अहवाल दिला होता. अहवालाची दखल घेत बॉयो टॉयलेटच्या गुणवत्ता वाढीसाठी रेल्वेने अतिरिक्त निधी दिला होता.रेल्वे कन्व्हेन्शन समितीत एकूण १८ सदस्य असतात. लोकसभेकडून १२ तर राज्यसभेकडून ६ सदस्य नामनिर्देशित केले जातात. लोकसभा अध्यक्ष समिती अध्यक्षांची नियुक्ती करतात. अर्थ व रेल्वे मंत्री समितीचे सदस्य असतात. १९४३ पासून ही समिती अस्तित्वात आहे. स्वातंत्र्यानंतर पहिली समिती १९४९ साली अस्तित्वात आली.रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर न करण्याच्या निर्णयानंतर रेल्वे मंत्रालयातील संयुक्त सचिवांनी ही समिती कायमस्वरूपी बरखास्त करण्याची शिफारस लोकसभा सचिवालयास केली. मात्र तत्कालीन केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू व अनंत कुमार यांनी ही शिफारस नाकारली होती.

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरShiv Senaशिवसेना