शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : शिवसेनेच्या खासदारांनाही वाटते भाजपासोबत सरकार व्हावे! - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 18:38 IST

Maharashtra News : गेल्या २५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये विविध स्तरावर चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : मी शिवसेनेच्या काही खासदारांशी चर्चा केली. त्यांनाही वाटते महाराष्ट्रात भाजपासोबत सरकार व्हावे. तीन आणि दोन वर्षे असा फॉर्म्युला असावा असे मला वाटते. लवकरच या दिशेने चर्चा होऊ शकते अशी माहिती केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

गेल्या २५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या धुराळ्यात केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी नवाच फॉर्म्युला देऊन या चर्चेत रंगत आणली आहे. मुख्यमंत्रीपदावरून उत्पन्न झालेला तिढा सोडविण्यासाठी ३ वर्षांसाठी भाजपाला मुख्यमंत्रीपद द्यावे व उर्वरित दोन वर्षे शिवसेनेने हे पद घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

आठवले म्हणाले, या फॉर्म्युल्यावर लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्याशी बोलणे झाले आहे. तीन-दोनचा फॉर्म्युला भाजपाला मान्य आहे काय? हे आधी स्पष्ट झाले पाहिजे, असे खासदार राऊत यांनी विचारले आहे.  सेनेच्या ब-याच खासदारांशीही मी या मुद्यावर बोललो. या फॉर्म्युल्याला भाजपाची मान्यता असेल तर आमचा पक्ष यासाठी सहमत होईल, असे मत खासदारांनी व्यक्त केले. खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह पाच-सहा खासदारांशी या मुद्यावर चर्चा झाल्याचा दावा आठवले यांनी केला.  

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याशीही या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे आठवले यांनी सांगितले. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर होणा-या निर्णयाला प्रदेश भाजपा बांधिल असल्याचे पाटील यांचे मत असल्याचे आठवले यांनी सांगितले.

तिढा लवकर सुटेल- शाहमहाराष्ट्रातील तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी सर्वपक्षीय बैठकीच्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आठवले यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील  तिढा लवकर सोडवावा, अशी विनंती शाह यांना केली. चिंता करू नका, सर्व काही ठिक होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केल्याचे आठवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019