शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत पुन्हा मिशन मोडमध्ये; राष्ट्रपतीपदासाठी 'पॉवर'फुल्ल राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 09:50 IST

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणल्यानंतर संजय राऊत यांचं नवं मिशन

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधून २०२२ मध्ये पवारांना राष्ट्रपती करण्याचे प्रयत्न राऊत यांनी सुरू केले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. भाजपानं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असला तरीही अनेक मोठी राज्यं पक्षाला गमवावी लागली आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात शरद पवार आणि संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी राऊत यांनी अनेकदा पवारांची भेट घेतली होती. आता राऊत देशातील भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात करणार आहेत. २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतरचे राष्ट्रपती पवार व्हावेत, यासाठी राऊत यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांना एकत्र आणण्याचा राऊत यांचा प्रयत्न असल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे.वर्षभरापूर्वी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. मात्र गेल्या वर्षभरात परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड या राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक भाजपासाठी सोपी असणार नाही. त्यामुळेच भाजपाविरोधातील पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न राऊत यांनी सुरू केले आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरुन भाजपाप्रणित एनडीएमधील मतभेद समोर आले आहेत. एनडीएमधील याच नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न राऊत यांच्याकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस