शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'17 मिनिटांत बाबरी मशीद पाडली, मग राम मंदिरासाठी कायदा करण्यास इतका वेळ का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 16:02 IST

शिवसेनेचा भाजपाला सवाल; राम मंदिराच्या मुद्यावरुन आक्रमक

लखनऊ: आम्ही १७ मिनिटांत बाबरी मशीद पाडली होती. मग राम मंदिरासाठी कायदा करण्यास किती वेळ लागतो?, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्य असो वा केंद्र, सगळीकडे भाजपाची सत्ता आहे. मग राम मंदिराच्या उभारणीला इतका वेळ का लागतो, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येला भेट देणार आहेत. या भेटीच्या तयारीसाठी सध्या संजय राऊत अयोध्येत आहेत. राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. 'राष्ट्रपती भवनपासून उत्तर प्रदेशापर्यंत भाजपाची सत्ता आहे. राज्यसभेतले अनेक खासदार राम मंदिराच्या बाजूनं उभे राहतील. राम मंदिराच्या उभारणीला जे विरोध करतील, त्यांचं देशात फिरणं अवघड होईल,' असा इशारादेखील त्यांनी दिला. राम मंदिरासाठी अध्यादेश आणण्याचं आणि त्याची नेमकी तारीख घोषित करण्याचं आव्हान याआधीच शिवसेनेनं भाजपाला दिलं आहे. राम मंदिरावरुन शिवसेनेनं अनेकदा पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपावर कडाडून टीका केली आहे. 'सत्तेत बसलेल्या लोकांना शिवसैनिकांचा अभिमान असायला हवा. शिवसैनिकांनी राम जन्मभूमीतील बाबर राज संपवलं होतं. शिवसेना कधीही रामाच्या नावानं मतांची भीक मागत नाही आणि जुमलेबाजीदेखील करत नाही,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं सामनामधून भाजपावर शाब्दिक हल्ला चढवले होते.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत