शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

येडियुरप्पांचा राजीनामा म्हणजे हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 09:00 IST

भाजपा आमदारांची संख्या 104 असल्यानं त्यांना बहुमतासाठी आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही जुळवाजुळव न झाल्यानं येडियुरप्पांनी राजीनामा दिला.

नवी दिल्ली - बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यानं येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यानंतर भाजपावर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज संध्याकाळी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. भाजपा आमदारांची संख्या 104 असल्यानं त्यांना बहुमतासाठी आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही जुळवाजुळव न झाल्यानं येडियुरप्पांनी राजीनामा दिला. यानंतर सर्वच स्तरावर टीका होत आहे. 

येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसकडून टीका केली जात असतानाच आता मित्रपक्ष शिवसेनेही भाजपाला घेरलं आहे.  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बी.एस येडियुरप्पा यांच्यासह भाजपावर सडकून टीका केली आहे. ते म्ङणाले, कर्नाटकात जे झालं ते लोकशाहीच्या विरोधात झालं होतं. पण न्यायालयाच्या निर्णायमुळं विकृत मानसिकतेचा अंत झाला आहे. आणि ही अहंकार आणि हिटलरशाहीच्या अस्ताची सुरुवात आहे. कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकली जाते आणि सत्ता स्थापन केली जाऊ शकते असे वाटते असे वाटणाऱ्या विकृत मानसिकतेचा पराभव झाला आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत