शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शिवसेनेचं 'उत्तरायण'! उत्तर प्रदेशात लढवणार 25 जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 7:10 AM

बिहार, जम्मूतही उमेदवार देण्याचा शिवसेनेचा विचार

मुंबई: सत्तेत असूनही अनेकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारी शिवसेना येत्या निवडणुकीत देशभरात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात मित्र पक्षांसह निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केली आहे. लवकरच याबद्दलची घोषणा शिवसेनेकडून केली जाऊ शकते. महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं उत्तर प्रदेशात पक्षविस्तार करण्याची योजना आखली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'नवभारत टाईम्स' या हिंदी वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली. येत्या लोकसभा निवडणुकीत देशभरात उमेदवार देण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, जम्मूमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे. या राज्यात सध्या शिवसेनेकडून मित्रपक्षांचा शोध सुरू आहे.  उत्तर प्रदेशात भाजपाचे मित्र पक्ष संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या पक्षांच्या मदतीनं उत्तर प्रदेशात 25 जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांच्यासोबत अनेक बैठका झाल्याची माहिती राऊत यांनी दिली. मात्र याबद्दलचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक भागातून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी