शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

शिवसेना उमेदवाराला फक्त 112 मतं, ओवैसींपुढे भाजपा-काँग्रेससह सर्वांचंच डिपॉझिट जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:48 PM

चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून बाजी मारत अकबरुद्दीने ओवैसी यांनी पाचव्यांदा आपली आमदारकी कायम राखली आहे.

हैदराबाद - आपल्या वादग्रस्त भाषणबाजीमुळे चर्चेत असलेल्या एमआयएमच्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्यापुढे काँग्रेस, भाजपा अन् शिवसेना नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवैसी यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ओवैसी यांच्याविरोधात लढणाऱ्या शिवसेना उमेदवाराला केवळ 112 मतं मिळाली आहेत. त्यामुळे औवेसींविरुद्ध लढणाऱ्या सर्वच 14 विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 

चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून बाजी मारत अकबरुद्दीने ओवैसी यांनी पाचव्यांदा आपली आमदारकी कायम राखली आहे. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ओवैसी बंधूंमध्येही शब्दयुद्ध रंगलं होतं. त्यामुळे एमआयएमच्या निवडणुकीतील कामगिरीबद्दल उत्सुकता होती. त्यामध्ये केवळ भाषणबाजीतूनच नाही तर, मतदारांना आपल्याकडे खेचण्यातही अकबरुद्दीन यांना यश मिळाले आहे. अकबरुद्दीन यांना 64,853 मतं मिळाली असून त्यांच्याविरोधातील काँग्रेस उमेदवाराला 7475 मतं मिळाली आहेत. तर, भाजपा उमेदवाराला 8137 मते घेण्यात यश आले. तसेच राज्यात सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला येथील जागा खेचून आणण्यात अपयश आले आहे. कारण, टीआरएसच्या उमेदवाराला येथे 7658 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ओवेसींपुढे काँग्रेस, भाजपा, टीआरएससह शिवसेना आणि इतर सर्वच अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या निवडणुकीत नोटाला 569 मतं मिळाली आहेत.  

विजयी उमेदवारास मिळालेल्या मतदानाच्या 1/3 (एक तृतिअंश) मतदान मिळवणे विरोधी उमेदवारास आवश्यक आहे. अन्यथा, त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. निवडणूक आयोगाच्या या नियमानुसार चारही दिग्गज पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना उमेदवार सुदर्शन मलकान यांना केवळ 112 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेनं या मतदारसंघात उमेदवार देत आपले हसू करुन घेतले, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. दरम्यान, ओवैसींविरुद्ध अक्कीनामोनी व्यंकटेश या अपक्ष उमेदवाराला सर्वात कमी म्हणजे 60 मतं मिळाली आहेत. दरम्यान, ही आकडेवारी दुपारी 12.46 पर्यंतची आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीTelanganaतेलंगणाShiv SenaशिवसेनाAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल