Shimla Water Crisis : पर्यटकांनी शिमल्यात येऊ नये, स्थानिकांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 17:50 IST2018-05-31T17:50:46+5:302018-05-31T17:50:46+5:30
हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पाण्याचा तुटवटा असल्यामुळे येथील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घातला आहे. तसेच, काही जण शहरातील रस्त्यांवर आंदोलन करत आहेत.

Shimla Water Crisis : पर्यटकांनी शिमल्यात येऊ नये, स्थानिकांचे आवाहन
शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पाण्याचा तुटवटा असल्यामुळे येथील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घातला आहे. तसेच, काही जण शहरातील रस्त्यांवर आंदोलन करत आहेत.
येथील स्थानिक नागरिक पर्यटकांना न येण्याची विनंती करत आहेत. पर्यटकांनी शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी पर्यटनासाठी जावे, कारण याठिकाणी पाण्याचा फारच तुटवडा आहे. अशाप्रकारच्या पोस्ट नागरिक सोशल मीडियावर करत आहेत.
Himachal Pradesh: Locals blocked NH 5 near Kachi Ghati area in Shimla in protest against severe water crisis in the region. pic.twitter.com/DEarV7ElDE
— ANI (@ANI) May 31, 2018
एका व्यक्तीने पर्यटकांना आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिमल्यात आम्हाला पाणी नाही. त्यामुळे कृपया शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळाला भेट द्यावी. याचबरोबर, सरकारने नियमावली जारी करुन शिमल्यामध्ये न येण्यास सांगायला पाहिजे. येथील स्थानिकांना पाणी मिळत नाही, अशा परिस्थितीत येथे येऊन पर्यटकांनी आणखी अडचणी वाढवू नये, असे एकाने म्हटले आहे.