मराठमोळी शिल्पा शिंदे बनली 'बिगबॉस 11' ची विनर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 11:07 IST2018-01-14T23:57:13+5:302018-01-15T11:07:42+5:30

‘बिग बॉस’ या वादग्रस्त कार्यक्रमाच्या अकराव्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली

Shilpa Shinde becomes Big Boss 11 Winner !! | मराठमोळी शिल्पा शिंदे बनली 'बिगबॉस 11' ची विनर!!

मराठमोळी शिल्पा शिंदे बनली 'बिगबॉस 11' ची विनर!!

मुंबई - ‘बिग बॉस’ या वादग्रस्त कार्यक्रमाच्या अकराव्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत शिल्पा शिंदे हिने बाजी मारली. शिल्पाने टीव्हीची लाडकी ‘बहू’ हिना खान हिला मात देत ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले शिल्पाला हिनाच्या तुलनेत प्रचंड वोट मिळाले. वास्तविक शोच्या सुरुवातीपासूनच शिल्पा शिंदे शोमध्ये विजेत्या ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार समजली जात होती. परंतु मधल्या काळात हिना खान आणि विकास गुप्ता तिच्यावर भारी पडताना दिसत होते. मात्र अखेर बिग बॉसने करोडो प्रेक्षकांची फेव्हरेट शिल्पा शिंदेलाच या शोची विजेता निश्चित केल्याची चर्चा आहे. 

बिग बॉसचा यंदाचा अंतिम सोहळा चांगलाच रंगला. यावेळी पुनीश आणि बंदगीचा पूल डान्स, अर्शी खान आणि हितेन तेजवानी या जोडगोळीचा रेट्रो स्टाईल परफॉर्मन्स, हिना खान- लव्ह त्यागी आणि प्रियांक शर्मा या त्रिकुटाच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.

सर्वात अगोदर पुनीश शर्मा विजेत्यांच्या रेसमधून बाहेर पडला. त्यानंतर विकास गुप्ता याला देखील कमी वोट मिळाल्याने, त्याला या रेसमधून बाहेर पडावे लागले. अखेर ड्रामा क्वीन हिना खान आणि बिग बॉसच्या घरातील मॉँ शिल्पा शिंदे यांच्यात टसन सुरू झाली. शिल्पा शिंदेने सुरुवातीपासून आघाडी घेत बिग बॉसचा ताज आपल्या नावे केला. 



 

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या 11 व्या पर्वाचा विजेता कोण असणार या संदर्भात अनेक तर्क लढवले जात होते. या रिअॅलिटी शोची सुरूवात 19 स्पर्धकांनी झाली. अंतिम फेरीत विकास गुप्ता, शिल्पा शिंदे, हिना खान आणि पुनीश शर्मा हे चार स्पर्धक दाखल झाले होते. संपूर्ण पर्वात शिल्पा शिंदेच प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या पर्वाची विजेतीही तीच होईल असे अनेकांचे म्हणणे होते. ही शक्यता अखेर खरी ठरली. 

Web Title: Shilpa Shinde becomes Big Boss 11 Winner !!