शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

'त्या ठिकाणी मशिदच बनणार, कोणासाठीच जागा नाही सोडणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 9:13 PM

मशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल, जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी...

ठळक मुद्देमशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी

लखनऊ, दि. 18 - मशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल असं विधान रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादावर  शिया मुस्लिमांचे धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी केलं आहे. जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी असं मजलिस-ए-उलेमा-ए-हिंदचे महासचिव कल्बे जव्वाद म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या बाजूने लागला, तरी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी केले होते. 

सादिक यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना कल्बे जव्वाद म्हणाले, जे लोकं राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांना स्वतःची जमीन देण्याचा अधिकार आहे. मशिदिसाठीच्या जमिनीबाबत ते अशी घोषणा करू शकत नाहीत. जी गोष्ट तुमची नाहीये त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये.  त्या जागेवरील आपला दावा सोडून द्या असं सांगणा-यांनी यासाठी स्वतःचं घर आणि संपत्ती दान करावी असं ते म्हणाले. एनबीटीने याबाबत वृत्त दिलं आहे.  

काय म्हणाले होते मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक -अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या बाजूने लागला, तरी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी रविवारी येथे केले.वरळी येथील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया’ येथे ‘अहिंसा विश्व भारती’ या संस्थेतर्फे आयोजित ‘जागतिक शांतता परिषदेत’ ते बोलत होते. अयोध्येतील हा वाद हिंदू व मुस्लीम परस्पर सन्मानाने सोडविण्यावर भर देत, कल्बे सादिक यांनी त्या दृष्टीने शिया समुदायातर्फे हे सलोख्याचे पाऊल टाकले.मौलाना कल्बे सादिक म्हणाले की, रामजन्मभूमी-बाबरी मशिदीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाचा निकाल मुस्लीम समाजाच्या विरोधात गेला, तरी त्यांनी तो शांततेने मान्य करावा. आपल्या या मताला इस्लामी धर्मशास्त्राचा दाखला देत, कल्बे सादिक म्हणाले की, जो मनापासून दान करतो, त्याला अल्ला काही कमी पडू देत नाही. त्यामुळे सर्वात प्राणप्रिय अशी वस्तू दिल्याने देणा-याला त्याच्या हजारपटीने परत मिळते. मौलाना कल्बे सादिक शिया पंथियांच्या ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्षही आहेत.