पत्रके

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30

पत्रके

Sheets | पत्रके

पत्रके

्रके
आरोग्य शिबिराची सांगता
औरंगाबाद : अर्पण सामाजिक प्रतिष्ठान औरंगाबाद व न्यूट्रिशन वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या बाजूला जय भवानीनगर येथे बॉडीचे चेकअप व फॅट चेकअप करण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन प्रकाश इंगळे यांनी केले.
------
शाखा स्थापन
औरंगाबाद : शिवक्रांती युवा सेनेच्या गारखेडा शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. संतोष संत्रे, डॉ. सुखदेव गरड, सुनील कोटकर, मच्छिंद्र उबाळे, ज्ञानेश्वर गायकवाड, मनोज पवार आदी उपस्थित होते.
------
सामुदायिक व्रतबंध
औरंगाबाद : शिवाजीनगर ब्राह्मण जागृती मंडळातर्फे २४ एप्रिल रोजी सामुदायिक व्रतबंधाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी गजानन बुक सेंटर शिवाजीनगर, एस. व्ही. सेवलीकर, रमेश कुलकर्णी, राजेंद्र भालेराव, संजय मोगरकर यांच्याशी संपर्क साधावा.
-------

Web Title: Sheets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.