As she resisted the rape, the scissors pierced her until she lost consciousness, the girl's condition is serious | बलात्काराला विरोध केला म्हणून कात्रीनं बेशुद्ध होईपर्यंत भोसकले, मुलीची प्रकृती गंभीर 

बलात्काराला विरोध केला म्हणून कात्रीनं बेशुद्ध होईपर्यंत भोसकले, मुलीची प्रकृती गंभीर 

ठळक मुद्दे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० लाखांची नुकसान भरपाई कुटुंबियांना देणार असल्याची माहिती दिली आहे. आज १० लाख रुपये आजच कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. 

देशाच्या राजधानीत २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. बलात्काराला विरोध करणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर गंभीर हल्ला करण्यात आला आहे. मुलीला कात्रीनं वारंवार भोसकण्यात आल्यानं तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० लाखांची नुकसान भरपाई कुटुंबियांना देणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपी जेरबंद असून अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. तसेच आज १० लाख रुपये आजच कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. 

दिल्लीतल्या पश्चिम विहारमधील पीरा गरही परिसरात गुरुवारी धक्कादायक घटना घडली होती. १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. बलात्काराला तिनं विरोध केला. त्यामुळे बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीनं तिच्यावर कात्रीनं जोरदार हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांना आरोपीच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या आहेत. त्यातून अल्पवयीन मुलीनं बलात्काराला विरोध केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. त्याला आधी इतर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. तो तुरुंगातही गेला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेऊन आणि जवळपास १०० जणांची चौकशी केल्यानंतर आरोपीला अटक केली. मात्र पोलिसांनी त्याची ओळख सांगितलेली नाही.

आरोपी चोरीच्या उद्देशानं घरात शिरला होता. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. घरात शिरल्यानंतर त्याला अल्पवयीन मुलगी दिसली. त्यानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं प्रतिकार केला. त्यावेळी आरोपीनं तिच्यावर कात्रीनं हल्ला केला. त्यानं अनेकदा तिला कात्रीनं भोसकलं. त्यामुळे मुलीच्या गुप्तांगाला आणि आतड्यांना गंभीर इजा झाली. तिच्यावर डोक्याला फ्रॅक्चरदेखील झालं आहे. बेशुद्ध होईपर्यंत मुलीनं प्रतिकार केला होता.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: As she resisted the rape, the scissors pierced her until she lost consciousness, the girl's condition is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.