'स्लो पॉइझन' देऊन प्रियकराचा काटा काढला, आता न्यायालयानं प्रेयसीला सुनावली मृत्यू दंडाची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:50 IST2025-01-20T16:50:02+5:302025-01-20T16:50:21+5:30
नेय्याटिंकरा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी, महिलेचा काका, निर्मलकुमारन नायर याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, तर महिलेच्या आईला आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

'स्लो पॉइझन' देऊन प्रियकराचा काटा काढला, आता न्यायालयानं प्रेयसीला सुनावली मृत्यू दंडाची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
केरळमध्ये एका प्रेयसीने तिच्या प्रियकराची स्लो पॉइझन देऊन त्याची हत्या केली होती. ही घटना 2022 मध्ये घडली होती. यानंतर आता केरळमधील एका न्यायालयाने संबंधित प्रेयसीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. नेय्याटिंकरा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी, महिलेचा काका, निर्मलकुमारन नायर याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, तर महिलेच्या आईला आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, २४ वर्षीय दोषी ग्रिष्मा हिनेही न्यायालयासमोर कमी शिक्षा करण्याचीही विनंती केली. ग्रिष्माच्या वतीने, सांगण्यात आले की ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांची शैक्षणिक कारकीर्दही चांगली आहे. शिवाय, तिचे पूर्वीचे कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. यामुळे शिक्षा सुनावताना याचा विचार व्हावा. दरम्यान, ५८६ पानांचा आपला निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, गुन्ह्याच्या गांभीर्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष देण्याची गरज नाही. ग्रीष्माला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण -
पोलीस रिपोर्टनुसार, पीडित शेरोन राज हा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील परसाळा येथील रहिवासी होती. ग्रिष्मा आणि त्याच्यामध्ये प्रेमसंबंध होते. १४ ऑक्टोबर रोजी ग्रिष्माने शेरोनला कन्याकुमारी येथील तिच्या घरी बोलावले आणि त्याला आयुर्वेदिक औषधीतील एक स्लो पॉइझन दिले. यानंतर, शेरोनला सातत्याने समस्या जाणवू लागल्या. ११ दिवसांनंतर, त्याच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आणि २५ तारखेला शेरोन राजचा रुग्णालयात मृत्यू झाला.
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, ग्रीष्माचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी निश्चित झाले होते आणि तिला हे नाते संपवायचे होते. जेव्हा शेरोनने नाते संपवण्यास नकार दिला तेव्हा तिने तिला संपवण्यासाठी हा कट रचला. तर दुसरीकडे, बचाव पक्षाने म्हटले आहे की, शेरोनकडे ग्रिष्माचे अश्लील फोटो होते, ज्याच्या आधारे तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. महत्वाचे म्हणजे, पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शेरोनच्या फोन आणि इतर वस्तूंच्या तपासणीत आतापर्यंत असे काहीही समोर आले नाही, ज्याच्या आधारे असा निष्कर्ष काढता येईल की, तो ग्रिष्माला ब्लॅकमेल करत होता.