ट्विटरवर शशी थरूर यांचे अनोखे अंदाज; चाहते, विरोधक आणि लोकांमध्ये वाढतेय लोकप्रियता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 08:08 AM2021-08-26T08:08:24+5:302021-08-26T08:08:34+5:30

Shashi Tharoor : एका मीममध्ये त्यांना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ डिक्शनरी म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर त्यांना कधी डब्ल्यू डब्ल्यू एफच्या रिंगणात दाखवले गेले आहे.

Shashi Tharoor's unique prediction on Twitter; Growing popularity among fans, opponents and the public pdc | ट्विटरवर शशी थरूर यांचे अनोखे अंदाज; चाहते, विरोधक आणि लोकांमध्ये वाढतेय लोकप्रियता

ट्विटरवर शशी थरूर यांचे अनोखे अंदाज; चाहते, विरोधक आणि लोकांमध्ये वाढतेय लोकप्रियता

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : आपला अनोखा अंदाज आणि विधानांनी चर्चेत राहणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर समाज माध्यमांतही खूप चर्चेत आहेत. ट्विटरवर त्यांच्या अनोख्या अंदाजाच्या मीम्स त्यांचे चाहते आणि विरोधक तसेच लोकांमध्ये चर्चेचे कारण बनले आहेत. त्यात थरूर कुठे पारंपरिक नृत्य करताना दाखवले आहेत, तर कुठे नारळाने आपल्या विरोधकांना लक्ष्य करताना. एका मीममध्ये त्यांना स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ डिक्शनरी म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर त्यांना कधी डब्ल्यू डब्ल्यू एफच्या रिंगणात दाखवले गेले आहे.

या सगळ्या मीम्समध्ये शशी थरूर पिवळा कुर्ता आणि फिकट पांढऱ्या रंगाच्या धोतराच्या पारंपरिक केरळी पोषाखात नजरेस पडतात. त्यांच्या उजव्या हातात नारळ आहे. थरूर यांचे हे मीम्स त्यांच्या एका पोस्टवरून घेण्यात आलेल्या छायाचित्रातून बनवले गेले आहेत. २१ ऑगस्टच्या या चित्रात ते एक अनुष्ठानादरम्यान नारळ फोडताना दिसतात. 
थरूर यांना स्वत:ला हे माहीत नाही की, अशा प्रकारची कल्पना कोणाची आहे; पण ते याचा खूप आनंद घेत आहेत. 

मीम्सची होतेय चर्चा...
या मीम्सची चर्चा करणाऱ्यांमध्ये थरूर यांचे चाहते तसेच विरोधकही आहेत. अर्थात दोन्ही पक्ष खूप आनंद घेत आहेत, तर काही विरोधक त्यांचे मीम शेअर करून त्यांना लक्ष्यही करीत आहेत. चाहत्यांत असोत की विरोधकांत थरूर यांची लोकप्रियता वाढत आहे.

Web Title: Shashi Tharoor's unique prediction on Twitter; Growing popularity among fans, opponents and the public pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.