शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं, काँग्रेसला खटकलं! जयराम रमेश स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 23:42 IST2025-02-15T23:40:50+5:302025-02-15T23:42:40+5:30
Jairam Ramesh on Shashi Tharoor : दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते तथा खासदार शशी थरूर यांनी पीएम मोदी यांचे कौतुक केले. यानंतर काँग्रेसने ते शशी थरूर यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.

शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं, काँग्रेसला खटकलं! जयराम रमेश स्पष्टच बोलले
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून परतल्यानंतर, आता काँग्रेस त्यांच्यावर सातत्याने राजकीय टीका करताना दिसत आहे. दरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते तथा खासदार शशी थरूर यांनी पीएम मोदी यांचे कौतुक केले. यानंतर काँग्रेसने ते शशी थरूर यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या शिवया, २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वुर राणा ते एफ-३५ लढाऊ विमानापर्यंत दोन्ही देशांमधील भागीदारीच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्या.
काय म्हणाले जयराम रमेश -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी, शशी थरूर यांचे विधान वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X) वर पोस्ट करत ते म्हणाले, "अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य असणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा आपल्या देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे जिथे आणि येथे अभिव्यक्तीनंतरही सदस्यांचे स्वातंत्र्य आबाधित राहते. आमचे सदस्य विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त करत असतात. ते कधीकधी त्यांचे वैयक्तिक विचारही असतात. मात्र, पक्षाची अधिकृत भूमिका ही सर्वोपरी असते."
काय म्हणाले होते शशी थरूर?
एएनआय सोबत बोलताना काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, 'अवैध स्थलांतरितांना भारतात पाठवण्याच्या पद्धतीवर का लक्ष दिले गेले नाही? की पंतप्रधान मोदींनी बंद दाराआड हा मुद्दा उपस्थित केला? तसेच, आता व्यापार आणि करासंदर्भात पुढील 9 महिन्यांसाठी चर्चा करण्यासाठी एक करार झाला आहे, मी याचे स्वागत करतो. हे वॉशिंगटनकडून घाईघाईने आणि एकतर्फीपणे आपल्यावर काही शुल्क लादण्यापेक्षा फार चांगले आहे. ज्यामुळे आपल्या निर्यातीला नुकसान झाले असते.
थरूर म्हणाले, "काही तरी चांगले मिळाले, असे मला वाटते आणि एक भारतीय म्हणून मी याचे कौतुक करतो. आपण नेहमीच केवळ पक्ष हितासंदर्भातच नही बोलू शकत. तत्पूर्वी, "अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सर्वात मोठे नेगोशिएटर आहेत, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. ट्रम्प हे एक उत्तम नेगोशिएटर असल्याचे त्यांच्या संरक्षणमंत्र्याने कालच म्हटले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पेक्षाही मोठे नेगोशिएटर असल्याचे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत म्हटले आहे. हे छोन होते.