सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:59 IST2025-10-31T17:57:11+5:302025-10-31T17:59:00+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील ५६२ संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणत राष्ट्रीय एकात्मतेची भक्कम पायाभरणी केली होती. त्यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून २०१४ पासून साजरा केला जातो.

सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी शुक्रवारी भारताचे पहिले गृहमंत्री तथा ‘लोहपुरुष’ म्हणून परिचित असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. पटेल यांच्या जयंतीनिमित्त, महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी यांच्या हवाला देत थरूर म्हणाले, 'भारताचे अंतर्गत मॉनिटरिंग सरदार पटेल यांच्या महान आत्म्याच्या सत्यतेतून येते'.
थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “सरदार पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. पण गोपालकृष्ण गांधी यांच्या या ओळी विशेषतः लक्षवेधी आहेत. जर भारतीय प्रजासत्ताकाच्या जीवनात कणा असेल, तर तो डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पातून येतो; जर त्यात जिवनात चमक असेल, तर ती नेहरूंच्या विचारांतून येते; पण जर त्यात एक अंतर्गत मॉनिटरिंग असेल, तर ती पटेल यांच्या महान आत्म्याच्या सत्यतेतून येते. भारत त्या अशांततेच्या काळात या तिकडीचे नेतृत्व लाभल्याने धन्य झाला होता. भारताच्या लौह पुरुषाला माझा प्रणाम."
सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील ५६२ संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणत राष्ट्रीय एकात्मतेची भक्कम पायाभरणी केली होती. त्यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून २०१४ पासून साजरा केला जातो.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पटेलांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लिहिले, “भारताला एक सूत्रात बांधून राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा पाया मजबूत करणारे ते द्रष्टे नेते होते. त्यांचे धाडस, दूरदृष्टी आणि आदर्श आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल.”