शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 3 जणांचा मृत्यू; भाजप आमदाराच्या घरात IED ब्लास्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 19:43 IST

CBI ने हिंसाचाराच्या चौकशीसाठी DIG दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केले.

इंफाळ : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अजून शमलेला नाही. आज पुन्हा एकदा मणिपूरच्या कुकी बहुल गावात हिंसाचार झाला, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. 

दुसरीकडे, गुरुवारी भाजप आमदाराच्या घरी आयईडी स्फोट झाल्याची बातमीही समोर आली. दोन जण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी ही घटना घडवली. या घटनेमुळे भाजप नेत्याच्या घराच्या गेटचे नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गावात ही घटना घडली ते गाव पूर्णपणे कुकीबहुल आहे. हे गाव कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांच्या सीमेला जोडलेले आहे.

हिंसाचारात 105 जणांचा मृत्यू राज्यात कुकी आणि मेईतेई यांच्यातील संघर्षात आतापर्यंत 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंफाळ खोऱ्यात 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये राहणारे आदिवासी मेईतेई आणि कुकी समुदायामध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून 40,000 लोक विस्थापित झाले आहेत. मेईतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिल्यानंतर हा हिंसाचार उसळला आहे. वाढत्या चकमकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले.

CBI कडून SIT ची स्थापनाCBI ने शुक्रवारी मणिपूरमधील हिंसाचाराच्या चौकशीसाठी DIG दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी 6 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यातील पाच गुन्हेगारी कटाचे आहेत, तर एक सामान्य कटातील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या दौऱ्यात हिंसाचाराची सीबीआय चौकशी करणार असल्याची माहिती दिली होती. यावेली शहांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, कुकी, मेईतेई समाज आणि इतरांच्या वेगवेगळ्या वेळी बैठका घेतल्या. शहा यांनी लोकांना शांततेचे आवाहनही केले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसagitationआंदोलन