शारदा घोटाळा: बोस यांची पुन्हा चौकशी
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:15+5:302015-02-14T23:52:15+5:30
शारदा घोटाळा : माजी खासदाराची पुन्हा चौकशी

शारदा घोटाळा: बोस यांची पुन्हा चौकशी
श रदा घोटाळा : माजी खासदाराची पुन्हा चौकशीकोलकाता : शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रींजय बोस यांची सीबीआयने तीन तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. जामीन मिळाल्यानंतर बोस यांनी सीबीआय कार्यालयाला दिलेली ही पहिलीच भेट होती. ४ फेब्रुवारी रोजी अलिपोर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला होता. सीबीआय चौकशीसाठी बोलावील तेव्हा हजर व्हावे आणि देशाबाहेर जाऊ नये, या अटीखाली त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर बोस यांनी पक्षासोबतच राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता.