योगगुरू बाबा रामदेव पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यावरून वादात सापडले आहेत. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी 'सरबत जिहाद' असा उल्लेख केला आहे. यानंतर आता लोकांनी त्याचा विरोध करायला सुरुवात केली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, बाबा रामदेव पतंजली सरबतचा प्रचार करताना दिसत आहेत. यावेळी, सरबत विकणारी एक कंपनी तिच्या कमाईचा काही भाग मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी वापरते, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
...तर 'त्या' कमाईचा वापर मदरसे-मशिदी बांधण्यासाठी -सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्याया व्हिडिओमध्ये बाबा रामदेव सॉफ्ट ड्रिंकवर टीका करताना दिसत आहेत. ते टॉयलेट क्लिनर सारखे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जे गरमीच्या दिवसांत तहाण भागवण्यासाठी घेतले जातात. हे विष असून भारतीयांच्या प्रकृतीवर हल्ला असल्याचे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात, "गरमीच्या दिवसांत लोक तहाण भागवण्यासाठी थंड पेय पितात. खरे तर ते टॉयलेट क्लीनर आहेत. एक बाजूला टॉयलेट क्लीनरसारख्या विषाचा हल्ला, तर दुसऱ्या बाजूला सरबद विकणारी एक कंपनी आहे, जी यातून होणाऱ्या कमाईचा वापर मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी करते. ठीक आहे, तो त्यांचा धर्म आहे"
तर यातून गुरुकुल, आचार्यकुल आणि भारतीय शिक्षण बोर्डांना मदत मिळेल -बाबा रामदेव पुढे म्हणातात, जर तुम्ही त्या कंपनीचे सरबत पिले, तर यामुळळे मशिदी आणि मदरशांसाठी पैसा जमवण्यास मदत मिळेल. तसेच आपण पतंजलीचे सरबत निवडले, तर यातून गुरुकुल, आचार्यकुल, पतंजली विद्यापीठ आणि भारतीय शिक्षण बोर्डांना मदत मिळेल.