शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

Farmers Strike : देशात 1977 सारखी परिस्थिती, विरोधकांची एकजूट होण्यास सुरुवात - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 10:12 IST

1977 सारखी पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. 

मुंबई - इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर 1977 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी विरोधकांनी इंदिरा गांधीचे सरकार कोसळवले होते. सध्या 1977 सारखीच परिस्थिती झाली आहे. सध्याचे सरकारही एकखांबी नेतृत्व चालत आहे. 1977 मध्ये ज्याप्रमाणे विरोधकांनी एकजूट होऊन सत्ताधाऱ्यांना खाली खेचले तसेच आताही सर्व विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. 1977 सारखी पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांत दहा पैकी 9 जागी भाजपा पराभूत झाली. त्यामुळे बदलत चाललेले जनमत लक्षात घेऊन आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे, आणि ही विरोधकांसाठी मोठी गोष्ट आहे असेही पवार म्हणाले. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या भाजपाने विरोधाकांना मान दिला पाहिजे आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये विराधकांना मानाचे स्थान द्यावे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. 

 

शेतक-यांना दिलेली आश्वासने सरकाराने पाळली नाहीत. शेतक-यांबाबत सरकारची नियत चांगली दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांनी त्यांचे प्रश्न सुटेपर्यंत टोकाची भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के फायदा हा शेतीमालाच्या किमतीचा आधार धरला जाईल आणि त्या पद्धतीने पाऊले टाकली जातील असे जागोजागी सांगत होते. पण गेल्या चार वर्षात याची अंमलबजावणी झाली नाही. दिल्लीसह दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतक-यांच्या या संघर्षात सर्वांनाच उतरावे लागेल. त्यांना पाठबळ द्यावे लागेल. शेतक-यांनी रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकण्याऐवजी गोरगरिबांना द्यावा. जेणेकरून कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि गरीबांची सहानुभूती आपल्याला मिळेल. शेतक-यांनी या आंदोलनात सामान्य माणसाला त्रास होईल असे कोणतेही काम करू नये असे आवाहनही पवार यांनी केले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस