शरद पवार-पार्थ पवार आले आमने-सामने; दिल्लीत सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 07:00 IST2023-11-21T07:00:21+5:302023-11-21T07:00:53+5:30
राष्ट्रवादी कुणाची; निवडणूक आयोगापुढे सुनावणी

शरद पवार-पार्थ पवार आले आमने-सामने; दिल्लीत सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि पक्षाच्या चिन्हावर दावा करण्यासाठी आज निवडणूक आयोगापुढे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आमने-सामने उभे ठाकले. अजित पवार गटाकडून बनावट प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आल्याचे पुरावे शरद पवार गटाने सादर केले.
खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल करणाऱ्या अजित पवार गटाविरुद्ध फौजदारी खटला चालविण्याची मागणी वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी केली.
बनावट प्रतिज्ञापत्राचा सादर केला पुरावा
शरद पवार गटाने कुंवर प्रतापसिंग यांच्या रूपाने आयोगापुढे पुरावाच सादर करताना अजित पवार गटाने हजारो खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा आरोप केला, तर सुनावणी लांबविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची टीका अजित पवार गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी केली.
आता शरद पवार गटाने सुनावणीसाठी मुख्य मुद्दे उपस्थित करावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने यावेळी दिले.