शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांविरोधात ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल राहुल गांधी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:50 IST

ईडीच्या कारवाईवर राहुल गांधींचं भाष्य

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून शरद पवारांचेही नाव ईडीने दाखल केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असून आता शरद पवार यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका एक महिन्यानंतर होणार असून, त्याआधीच राजकीय संधीसाधूपणाच्या वृत्तीतून ही कारवाई झाली आहे. विविध प्रकरणांत विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकार गोवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी याआधी केला होता. आयएएक्स मीडिया घोटाळ्यामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे.विरोधकांना केले जात आहे लक्ष्यपश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर सूडाने कारवाई होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला होता.विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मोदी सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानेही याआधी केला आहे.एका प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व अन्य काही प्रकरणांत प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावरही खटले दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस