मला ठार मारून जंगलात पुरण्याचा शामीचा कट होता; हसीनचा आणखी एक सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 20:43 IST2018-03-09T13:44:57+5:302018-03-09T20:43:09+5:30

एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हसीनने शमीवर तिच्या हत्येचा कट आणि मॅच फिक्सिंगचा सनसनाटी आरोप केला आहे.

Shami wanted to bury my body in jungle says Hasin Jahan | मला ठार मारून जंगलात पुरण्याचा शामीचा कट होता; हसीनचा आणखी एक सनसनाटी आरोप

मला ठार मारून जंगलात पुरण्याचा शामीचा कट होता; हसीनचा आणखी एक सनसनाटी आरोप

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शामीच्या आयुष्यात आलेल्या वादळांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शामीची पत्नी दिवसेंदिवस त्याच्यावर खळबळजनक आरोप करत आहे. तर, शामी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण देतोय. मला पत्नीसोबत बोलायचं आहे पण ती माझा फोन उचलत नाही असं शमी म्हणाला. पत्नी हसीन शामीचा फोन जरी उचलत नसली तरी विविध न्यूज चॅनल्सला ती इंटरव्यू देत आहे.  
एका पाकिस्तानी मुलीसोबत शमीचे अफेअर असून विविध मुलींसोबत ओळखी वाढविणे आणि त्यांच्याशी संबंध स्थापन करणे अशा कृत्यात मोहम्मद शमी गुंतला असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर हसीनने शामीवर आणखी एक आरोप केला आहे. एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हसीनने शमीवर तिच्या हत्येचा कट आणि मॅच फिक्सिंगचा सनसनाटी आरोप केला आहे. माझा खून करून मृतदेह जंगलामध्ये दफन करून टाक असं शामी त्याच्या भावाला म्हणाला होता असा गंभीर आरोप हसीनने केला आहे. 
हसीन पुढे म्हणाली, शमीने अनेकदा माझ्याकडे तलाकची मागणी केली आहे. तुला ज्या व्यक्तीसोबत राहायचं त्याच्यासोबत राहा, मला काही फरक पडत नाही. तुझ्या मुलाला घेऊन या घरातून निघून जा, मला काहीही घेणंदेणं नाही. जर घर सोडून नाही गेलीस तर धक्के मारून घरातून बाहेर काढेल अशी धमकी शमीने दिली होती, असे आरोप तिने केले आहेत. 
माझ्याविरुद्ध कट - शामी
दुसरीकडे पत्नीच्या आरोपांमुळे वैतागलेल्या शामीवर बीसीसीआयने नव्या करार यादीतून वगळल्याचा दुहेरी आघात झाला. एकाचवेळी दोन धक्के सहन करणा-या शामीने काल अखेर मीडियापुढे येत पत्नीने केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.पत्नीचे सर्व आरोप फेटाळताना शमीने हा माझ्याविरुद्ध रचलेला कट आहे. माझे करियर उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव असल्याचे म्हटले होते.माझ्याविरुद्धचे आरोप बिनबुडाचे असून हसीनने शमी पाच वर्षांपासून मला त्रास देत असल्याचे म्हटले आहे. आमच्या लग्नाला केवळ चार वर्षे झाली. इतक्या वर्षांपासून हे होत असेल तर आताच ते बाहेर का आले? या बाबी बाहेर येण्यास पाच वर्षे का लागली? मी सामान्य नागरिक आहे. सणासुदीला घरी असेल तेव्हा कुटुंबीयांसोबत राहतो. पत्नी आणि मुलीसोबत वेळ घालवितो.काही दिवसाआधी माझी पत्नी सोशल मीडियावर ट्रोल झाली त्यावेळी तिच्यासोबत खंबीरपणे उभा होतो आणि यापुढेही तिच्यासोबत उभा असेन,’ ज्या मोबाईलबाबत पत्नी सांगते, तो माझा नाही. मी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या कशा काय स्वीकारू. तो माझा नंबर नाही. द. आफ्रिकेत हसीनने शॉपिंगसाठी हट्ट केला तेव्हा मी तिला घेऊन गेलो. निवडकर्ते माझ्यासोबत होते. शॉपिंग केली, ज्वेलरी घेऊन दिली. सोबत होळी साजरी केली. अचानक काय घडले हे मलाही ठाऊक नाही.’मी हसीनसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तिने फोन उचलला नाही. मी माझ्या सास-यांसोबत चर्चा केली. त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली. यावर लवकर तोडगा निघेल अशी आशा आहे.’

Web Title: Shami wanted to bury my body in jungle says Hasin Jahan