Video - अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळला, कर्मचाऱ्याने रुळावर ठिय्या मांडला; थांबवली मालगाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 18:23 IST2024-12-07T18:22:39+5:302024-12-07T18:23:34+5:30
कर्मचारी रेल्वे रुळावर ठिय्या मांडून बसला. वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप केला.

फोटो - ABP News
शाहजहांपूरमध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मचारी रेल्वे रुळावर ठिय्या मांडून बसला. वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप केला. तरुण बसलेला पाहून लोको पायलटने मालगाडी थांबवून तरुणाची विचारपूस केली. हा तरुण रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती मिळाली.
मोठ मोठे अधिकारी खूप काम करून घेतात. घरची कामंही करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेमो मिळताच आरपीएफ आणि जीआरपी घटनास्थळी पोहोचले आणि कर्मचाऱ्याला समजावून सांगितलं. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर दोघांमध्ये बोलणं झालं. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर विद्युत उपकेंद्राचे कार्यालय बांधले आहे. हरविंदर या कार्यालयात सहाय्यक म्हणून तैनात आहे.
एसएसई से नाराज कर्मचारी रेलवे ट्रैक पर बैठा, रोकनी पड़ी मालगाड़ी pic.twitter.com/27WBaZWKog
— kaushal (@kmstarnews) December 7, 2024
हरविंदरने कार्यालयात एसएसई म्हणून तैनात असलेल्या अधिकाऱ्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी रात्री एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हरविंदर शर्ट काढून रेल्वे ट्रॅकवर बसलेला दिसत आहे. काही अंतरावर एक मालगाडी थांबली आहे. मालगाडीच्या लोको पायलटने त्याला विचारलं असता एसएसई आपल्याला त्रास देत असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळेच तो आत्महत्या करण्याचा विचार करत आहे.
जीआरपी आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले, त्यांनी कर्मचाऱ्याला शांत केलं आणि पोलीस ठाण्यात आणलं. याप्रकरणी जीआरपी स्टेशन प्रभारी रेहान अली यांनी सांगितलं की, एक कर्मचारी रेल्वे रुळावर बसला होता. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कर्मचाऱ्याला रुळावरून हटवून पोलीस ठाण्यात आणलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.