शाहरुख सतत बघायचा झाकिर नाईकचे व्हिडीओ! कट्टरपंथी विचारांचा असल्याचे स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 07:09 IST2023-04-18T07:08:58+5:302023-04-18T07:09:29+5:30
केरळमधील कोझीकोड येथे ट्रेनला आग लावल्याच्या प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी हा कट्टरपंथी विचारांचा आहे. तो वादग्रस्त झाकिर नाईक याचे व्हिडीओ नेहमी पाहत असे.

शाहरुख सतत बघायचा झाकिर नाईकचे व्हिडीओ! कट्टरपंथी विचारांचा असल्याचे स्पष्ट
कोझीकोड : केरळमधील कोझीकोड येथे ट्रेनला आग लावल्याच्या प्रकरणातील आरोपी शाहरुख सैफी हा कट्टरपंथी विचारांचा आहे. तो वादग्रस्त झाकिर नाईक याचे व्हिडीओ नेहमी पाहत असे. शाहरुख हा दिल्लीतील शाहीनबाग येथील रहिवासी आहे. आपल्या कारवाया करण्यासाठी तो केरळमध्ये आला होता.
२ एप्रिल रोजी शाहरुख याने अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसच्या एका डब्यात यात्रेकरूंवर पेट्रोल फेकले व आग लावली होती. त्या घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. या तीन जणांनी आगीपासून वाचण्यासाठी धावत्या गाडीतून उडी मारली होती. त्याशिवाय आगीमुळे ट्रेनमधील नऊजण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र एटीएस, केंद्रीय तपास यंत्रणांनी शाहरुख सैफी याला रत्नागिरीतून अटक केली होती.
शाहरुख सैफी हा २७ वर्षे वयाचा आहे. त्याने नॅशनल ओपन स्कूलमधून इयत्ता १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून, ती मुदत मंगळवारी, दि. १८ एप्रिलला संपत आहे. अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये शाहरुखचे एका प्रवाशाशी भांडण झाले होते. त्यामुळे त्याने ट्रेनच्या डब्यात व प्रवाशांवर पेट्रोल फेकले व आग लावली होती. (वृत्तसंस्था)