शहा भाजपाध्यक्ष
By Admin | Updated: July 10, 2014 02:55 IST2014-07-10T02:55:55+5:302014-07-10T02:55:55+5:30
अमित शहा यांना भाजपाचे अध्यक्षपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारनंतर संघटनेवरही आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आह़े

शहा भाजपाध्यक्ष
नवी दिल्ली : आपले निकटवर्तीय अमित शहा यांना भाजपाचे अध्यक्षपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारनंतर संघटनेवरही आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आह़े आज बुधवारी भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांना सर्वसहमतीने पक्षाध्यक्ष म्हणून निवडले गेल़े
बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, संसदीय मंडळाचे अन्य सदस्य अनंत कुमार, संघटनेचे महासचिव राम लाल, थावरचंद गहलोत आणि अन्य पदाधिका:यांच्या उपस्थितीत पक्षाचे मावळते अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी नवे पक्षाध्यक्ष म्हणून अमित शहा यांच्या नावाची घोषणा केली़ या घोषणोनंतर लगेच शहा यांनी पदभार स्वीकारला़
मोदी आणि राजनाथ सिंह यांनी पेढा भरवून शहा यांना शुभेच्छा दिल्या़ मी नंतर बोलेन, असे सांगून शहा यांनी पत्रपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणो टाळल़े
राम माधव पक्षाचे सरचिटणीस?
भाजपाचे वैचारिक प्रेरणास्नेत मानल्या जाणा:या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले दोन प्रमुख प्रचारक राम माधव आणि शिवप्रकाश यांना भाजपात पाठवले आह़े या दोघांचीही महत्त्वपूर्णपदी वर्णी लागण्याची शक्यता आह़े राम माधव यांच्या गळ्यात पक्षाच्या महासचिवपदाची माळ पडू शकत़े नवे पक्षाध्यक्ष लवकरच या दोघांकडे नवी भूमिका सोपवितील़
राजनाथ सिंह यांनी मात्र या वेळी शहा यांची तोंडभरून स्तुती केली़ उत्तर प्रदेशातील शहा यांच्या कार्याची फळे लोकसभा निवडणुकीत पक्षाने चाखली़ त्यांच्या संघटन कौशल्याचा आगामी काळातही पक्षाला लाभ होईल, असे ते म्हणाल़े