शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मोदींच्या परराष्ट्रनितीला धक्का, चिमुकल्या सेशेल्सने अडवला भारतीय नौदलाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 7:27 PM

भारताच्या नौदलाला आपल्या देशात तळ उभा करु देणे म्हणजे आपल्या सार्वभौमत्त्वावर संकट आल्यासारखे आहे.

अॅन्से आऊक्स पिन्स- सेशेल्स या हिंदी महासागरातील चिमुकल्या देशाने भारत सरकारच्या एका मोठ्या निर्णयाचा मार्ग अडवून धरला आहे. भारत सरकारने सेशेल्समध्ये नौदलाचा तळ उभा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सेशेल्सच्या संसदेत त्याला मंजूरी मिळणे अत्यंत कठिण झाले आहे.भारताच्या नौदलाला आपल्या देशात तळ उभा करु देणे म्हणजे आपल्या सार्वभौमत्त्वावर संकट आल्यासारखे आहे अशाप्रकारचे मत तेथिल विरोधी पक्षांनी संसदेत व्यक्त केले आहे. भारत आणि सेशेल्स यांच्यामध्ये नौदल तळासंदर्भात करार झाला आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्याला आधीपासूनच विरोध केला असल्यामुळे सेशेल्स सरकारने तो करार संसदेसमोर न आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचे हिंदी महासागरात नौदलाचा तळ उभारण्याचे स्वप्न पूर्ण होणे सध्या शक्य दिसत नाही. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फाऊरे भारताच्या भेटीवर येत असून रविवारी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये नौदलाच्या तळाचा मुद्दा विचारात घेतला जाणार नाही असे फाऊरे यांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी