शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार पीडितांची ओळख उघड करण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 05:47 IST

बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रिया वा मुलींची नावे अथवा त्यांची ओळख उघड होईल, अशा प्रकारची अन्य माहिती प्रसिद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने माध्यमांना, तसेच समाज माध्यमांना (सोशल मीडिया) मंगळवारी पूर्ण मज्जाव केला.

नवी दिल्ली : बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रिया वा मुलींची नावे अथवा त्यांची ओळख उघड होईल, अशा प्रकारची अन्य माहिती प्रसिद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने माध्यमांना, तसेच समाज माध्यमांना (सोशल मीडिया) मंगळवारी पूर्ण मज्जाव केला. निपुण सक्सेना वि. भारत सरकार या प्रलंबित प्रकरणात पीडितांची ओळख गोपनीय ठेवण्यासंबंधी एक अर्ज केला गेला होता. त्यावर निकाल देताना न्या. मदन बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.दंड प्रक्रिया संहितेचे कलम २२८ ए, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (पॉक्सो कायदा) कलम २३ व न्यायालयीन अवमान कायद्याच्या कलम ३ मध्ये अशी तरतूद आहेच. माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात न्यायालयाने या तरतुदींचा तुलनात्मक विचार केला व असा निर्वाळा दिला की, माध्यमांचे स्वातंत्र्य अनिर्बंध नाही व उपयुक्त तरतुदींनी त्यावर घातलेले निर्बंध रास्त आहेत.सनसनाटी टाळान्यायालयाने म्हटले की, गुन्हेगारीचे वार्तांकन करण्याचे माध्यमांना स्वातंत्र्य आहे. त्यांचे ते कर्तव्यही आहे. मात्र, हे करत असताना निष्कारण सनसनाटी निर्माण करणे टाळायला हवे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयsexual harassmentलैंगिक छळ