शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

चार वर्षाच्या मुलाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, दिल्लीत घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 17:19 IST

द्वारका परिसरात चार वर्षांच्या मुलाविरोधात त्याच्याच वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली - येथील द्वारका परिसरात चार वर्षांच्या मुलाविरोधात त्याच्याच वर्गमैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पीडित मुलीच्या आईने मुलाला शाळेतून काढून टाकावे, अशी मागणी केली असून याप्रकरणात पोलिसांनी आता समुपदेशकांची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय.

एनडीटिव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने पोलिसांकडेही तक्रार दाखल केली असून मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. संबंधित मुलाविरोधात बलात्कार आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीचे वय सात वर्षांपेक्षा कमी असल्याने या प्रकरणात काय करायचे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिसांनी समुपदेशकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

बाल कल्याण समितीसमोर मुलीचा जबाब नोंदवला असून तपासात मदत करण्याच्या सूचना पोलिसांनी शाळा प्रशासनाला दिले आहेत. शाळा प्रशासन, शिक्षक यांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीवर हा प्रसंग ओढावल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. वर्गात शिक्षकांची गैरहजेरी आणि स्वच्छतागृहात आयाची अनुपस्थिती यावरुन शाळेचा निष्काळजीपणा सिद्ध होतो, असे महिलेचे म्हणणे आहे. दरम्यान, द्वारका परिसरातील शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीने शुक्रवारी तिच्या आईकडे पोटदुखीची तक्रार केली. सुरुवातीला मुलगी सहज म्हणते असावे असे आईला वाटले. पण दोन दिवसांनी मुलगी वेदनेने विव्हळत होती, रडत होती. शेवटी आईने मुलीला नेमकं काय होतंय हे विचारलं आणि मग तिने सांगितलेला प्रकार ऐकून आईला धक्काच बसला. पीडित मुलीवर तिच्याच वर्गातील चार वर्षांचा मुलगा लैंगिक अत्याचार करत होता. शाळेतील खोलीत आणि स्वच्छतागृहात त्याने अत्याचार केल्याचे तिने आईला सांगितले. महिलेने दुसऱ्या दिवशी शाळेतील शिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप महिलेने केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिसSchoolशाळा