सेक्स सीडी प्रकरण - धमकी मिळाल्याची तक्रार करणारा भाजपा नेताच झाला गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:57 IST2017-11-02T16:55:33+5:302017-11-02T16:57:20+5:30
सेक्स सीडी प्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार विनोद शर्मा सध्या रायपूर जेलमध्ये बंद आहेत. पण पोलीस ठाण्यात सीडी व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार करणारे भाजपा नेते प्रकाश बजाज गायब जाले असल्याचं सांगितलं जात आहे

सेक्स सीडी प्रकरण - धमकी मिळाल्याची तक्रार करणारा भाजपा नेताच झाला गायब
नवी दिल्ली - सेक्स सीडी प्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार विनोद शर्मा सध्या रायपूर जेलमध्ये बंद आहेत. पण पोलीस ठाण्यात सीडी व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार करणारे भाजपा नेते प्रकाश बजाज गायब जाले असल्याचं सांगितलं जात आहे. ते सध्या कुठे आहेत ? अजूनपर्यंत समोर का आलेले नाहीत ? या प्रश्नांवर अद्यापही सस्पेन्स कायम आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, सेक्स सीडी प्रकरणी तक्रार करणारे भाजपा नेता ना घऱात आहेत, ना कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यामुळे शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरु असून, सोशल मीडियावरही अनेक मेसेज फिरत आहेत. मोबाइल फोनवरुनदेखील ते कोणाशी संपर्क साधत नाहीयेत. त्यामुळे ते कुठे गेलेत असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.
दुसरीकडे सेक्स सीडी समोर आल्यानंतर ज्या महिलेचं नाव समोर आलं होतं, त्यांनी समोर येऊन सर्व आरोप फेटाळले आहेत. तसंच पोलीस केस दाखल केली आहे. तिथे, सेक्स सीडी प्रकरणी अटक करण्यात आलेले विनोद शर्मा यांनी आपल्याला पोलीस तपासावर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे. पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉप न्यायालयासमोर सील करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
वकिलांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अर्जात विनोद शर्मा यांना सांगितलं आहे की, ज्या क्लिपिंगवरुन वाद सुरु आहे ती गेल्या एक वर्षापासून इंटरनेटवर आहे. त्याची सीडी बनवून त्यांना फसवलं जात आहे. त्यांच्या घरी कोणतीची सीडी सापडलेली नाही. त्यांच्या घरुन पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून 500 सीडी, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह सापडलं असल्याचं सांगितलं होतं. या सर्व सीडी वाटण्यात येणार होत्या असा दावा पोलिसांनी केला होता.
गाजियाबादमधील इंदिरापुरम परिसरात असणा-या त्यांच्या घरातून पोलिसांनी विनोद वर्मा यांना अटक केली होती. रायपूर पोलिसांच्या एका पथकाने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली विनोद वर्मा यांना अटक केली. विनोद वर्मा एक वरिष्ठ पत्रकार असून, त्यांनी बीबीसीसाठी काम केलं आहे. आपल्या छत्तीसगड सरकारमधील मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी असल्याने अटकेची कारवाई करण्यात आल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे.