नोकरीचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:03+5:302015-01-29T23:17:03+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन भावांनी एका तरुणाला ७ लाखांनी गंडविले. शेखर रामदास लांबट आणि पद्माकर रामदास लांबट अशी आरोपींची नावे आहेत. ते उदयनगरात, हुडकेश्वरमध्ये राहातात. आरोपी पदमाकर जिल्हा परिषदेत कर्मचारी आहे. आरोपी शेखरसोबत कमलेश गणपतराव हणोते (वय ३०, रा. सोमवारी क्वॉर्टर) याची ओळख होती. आपल्या भावाचे जिल्हा परिषदेत अनेकांशी घनिष्ट संबंध आहे, त्यामुळे तुला नोकरी लावून देतो, असे आमिष आरोपीने कमलेशला दाखविले. नोकरीचे स्वप्न रंगविणाऱ्या कमलेशकडून आरोपींनी १५ जानेवारी २०१४ ला ७ लाख रुपये घेतले. मात्र, वर्षभराचा कालावधी होऊनही आरोपींनी त्याला नोकरी लावून दिली नाही. प्रत्येक वेळी नवीन कारण सांगून आरोपी टाळाटाळ करीत होते. त्यामुळे कमलेशने त्यांना रक्कम परत मागितली. तीसुद्धा आरोपींनी दिली नाही. त्यामुळे

नोकरीचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा
न गपूर : जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन भावांनी एका तरुणाला ७ लाखांनी गंडविले. शेखर रामदास लांबट आणि पद्माकर रामदास लांबट अशी आरोपींची नावे आहेत. ते उदयनगरात, हुडकेश्वरमध्ये राहातात. आरोपी पदमाकर जिल्हा परिषदेत कर्मचारी आहे. आरोपी शेखरसोबत कमलेश गणपतराव हणोते (वय ३०, रा. सोमवारी क्वॉर्टर) याची ओळख होती. आपल्या भावाचे जिल्हा परिषदेत अनेकांशी घनिष्ट संबंध आहे, त्यामुळे तुला नोकरी लावून देतो, असे आमिष आरोपीने कमलेशला दाखविले. नोकरीचे स्वप्न रंगविणाऱ्या कमलेशकडून आरोपींनी १५ जानेवारी २०१४ ला ७ लाख रुपये घेतले. मात्र, वर्षभराचा कालावधी होऊनही आरोपींनी त्याला नोकरी लावून दिली नाही. प्रत्येक वेळी नवीन कारण सांगून आरोपी टाळाटाळ करीत होते. त्यामुळे कमलेशने त्यांना रक्कम परत मागितली. तीसुद्धा आरोपींनी दिली नाही. त्यामुळे कमलेशने पोलिसांकडे धाव घेतली. हुडकेश्वर पोलिसांनी लांबट बंधूविरुद्ध कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ----