लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेले; अनुप्रिया पटेलांच्या पतीच्या कारला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:07 IST2023-09-27T16:07:13+5:302023-09-27T16:07:33+5:30
मेजा रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे.

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेले; अनुप्रिया पटेलांच्या पतीच्या कारला अपघात
प्रयागराज: अपना दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या कारला अपघात झाला आहे. लग्नाच्या वाढदिवसासाठी ते अनुप्रिया यांच्याकडे जाण्यासाठी निघाले होते. या अपघातात आशिष पटेल यांच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे. आशिष यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आशिष पटेल हे अपना दलाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रयागराजहून मिर्झापूरला जात असताना हा अपघात झाला आहे. आशिष पटेल हे उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आहेत. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली. पटेल यांच्या कारच्या बंपरचे नुकसान झाले आहे.
मेजा रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. अनुप्रिया पटेल या मिर्झापूरमध्ये आहेत. यामुळे आज मॅरिज एनिव्हर्सरी असल्याने ते देखील तिकडे निघाले होते.
अनुप्रिया पटेल या अपना दलाचे संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या कन्या आहेत. त्या सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. आशिष हे एमएलसी आहेत आणि योगी सरकारमध्ये मंत्री आहेत. 2017 मध्ये आईशी मतभेद झाल्यानंतर, अनुप्रिया पटेल यांनी अपना दलापासून फारकत घेतली होती. यानंतर अपना दल (सोनेलाल) पक्ष स्थापन केला होता. आशिष पटेल हे तंत्रशिक्षण मंत्री आहेत.