Serum fixes Covishield price at Rs 600 per dose for private and 400 for state governments | Serum नं निश्चित केली Covishield लसीची किंमत; पाहा किती असेल राज्य सरकार, खासगी रुग्णालयांसाठी दर

Serum नं निश्चित केली Covishield लसीची किंमत; पाहा किती असेल राज्य सरकार, खासगी रुग्णालयांसाठी दर

ठळक मुद्देसीरम इन्स्टिट्यूटनं दिली लसीच्या किंमतीची माहिती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांत सातत्यानं देशात अडीच लाखांच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारांनीही कठोर निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही उत्पादनाच्या ५० टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर निश्चित केले आहेत.

भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड लसीचे दर निश्चित केले आहेत. राज्य सरकारांना सीरम ही लस ४०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं तर खासगी रुग्णालयांना सीरम ही लस ६०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं देणार आहे. सीरम इन्स्टीट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार एकूण लसीच्या उत्पादनाचा ५० टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी दिला जाणार आहे.  तसंच उर्वरित हिस्सा हा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिला जाईल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली. 'पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लसींचं उत्पादन वाढवणार असून लसींची कमतरता भरून काढणार आहोत,' अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आली. पुढील पाच महिन्यांनंतर कोविशिल्ड ही लस रिटेल आणि फ्री ट्रेडमध्ये कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असेल, असंही कंपनीनं स्पष्ट केलं. दरम्यान, सीरमच्या कोविशिल्ड या लसीचे दर इतर देशांच्या लसीच्या तुलनेत कमी असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली. अमेरिकेच्या लसीची किंमत भारतीय रूपयांमध्ये १५००, तर रशियन लसीची किंमत ७५० रूपये आणि चिनी लसीची किंमतही ७५० रूपये असल्याचं सीरमनं म्हटलं. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Serum fixes Covishield price at Rs 600 per dose for private and 400 for state governments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.