शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 05:14 IST

Air India News: एअर इंडियाच्या एका विभागीय उपाध्यक्षाचाही समावेश आहे. तसेच तिघांविरोधात त्वरित शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आदेशही दिले.

मुंबई : विमानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळापत्रकातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत हे काम एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांकडून त्वरित काढून घेण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिले आहे. त्यामध्ये या कंपनीच्या एका विभागीय उपाध्यक्षाचाही समावेश आहे. तसेच तिघांविरोधात त्वरित शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आदेशही दिले.

डीजीसीएने २० जून रोजी हा आदेश जारी केला. त्याबाबत एअर इंडियाने शनिवारी म्हटले की, आम्ही आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. आता एअर इंडियाच्या चीफ ऑपरेशन्स ऑफिसरच्या देखरेखीखाली इंटिग्रेटेड ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरचे (आयओसीसी) कामकाज चालेल. आम्ही सुरक्षाविषयक नियम व कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करत आहोत. 

डीजीसीएने म्हटले की, लायसन्सिंग, विश्रांतीच्या वेळा तसेच उड्डाणाच्या अनुभवासंदतील निकष या गोष्टींबाबत कर्मचारीवर्गाच्या कामाच्या वेळापत्रकात गंभीर त्रुटी आढळल्या. उड्डाणाचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक अशा गोष्टींवर एअर रुट मॅनेजमेंट सिस्टीम (आर्म्स) या सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे बारीक लक्ष ठेवण्यात येते. त्यातूनच या त्रुटी लक्षात आल्या. 

१२ जून रोजी अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाने उड्डाण केल्यानंतर ते काही क्षणांतच कोसळले. त्यातील २४२ जणांपैकी एक जण बचावला व बाकीचे सर्व ठार झाले. एअर इंडियाकडून सध्या सर्व ड्रीमलायनर विमानांची तपासणी सुरू आहे.

एअर इंडियाला धाडली कारणे दाखवा नोटीस

विमान कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळापत्रक तयार करण्याबद्दलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

१६ व १७ मे २०२५ रोजी बंगळुरूहून लंडनकडे जाणाऱ्या एआय १३३ विमानाच्या उड्डाणांसंदर्भात अचानक तपासणी करण्यात आली. 

या उड्डाणांमध्ये चालक दलाने काम करावयाच्या १० तासांच्या मर्यादेचा भंग करण्यात आला होता असे आढळून आले. त्यामुळे एअर इंडियाकडून स्पष्टीकरण मागविले.

...तर एअर इंडियावर घातले जाऊ शकतात निर्बंध 

अशा प्रकारांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असा आदेश डीजीसीएने एअर इंडियाला दिला. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या चुका भविष्यात पुन्हा झालेल्या आढळल्यास एअरलाइन्सचा परवाना स्थगित करणे, विमान संचालनावर निर्बंध घालण्याचा आदेश एअर इंडियाविरोधात दिला जाऊ शकतो, असा इशाराही डीजीसीएने दिला.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातPlane Crashविमान दुर्घटनाCentral Governmentकेंद्र सरकार