शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात आरोग्यासाठी स्वतंत्र निधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 05:26 IST

प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन योजना; केंद्राने तयार केला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क   नवी दिल्ली : कोरोना, बर्ड फ्लू अशा विविध साथींनी सध्या देशाला ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद २०२१-२२च्या अर्थसंकल्पामध्ये करण्याची शक्यता आहे. त्या निधीमधून प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन ही नवी योजना राबविली जाईल.प्रधानमंत्री स्वास्थ्य संवर्धन योजनेची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. या योजनेच्या प्रस्तावात म्हटले आहे की, आरोग्य खात्याकरिता वर्षभरासाठी तरतूद केलेल्या स्वतंत्र निधीची रक्कम वित्तीय वर्ष संपले तरी अबाधित राहील. प्राप्तिकर व कॉर्पोरेट करावर केंद्र सरकार शिक्षण व आरोग्य विषयांसाठी ४ टक्के उपकर लादते. त्यातील ३ टक्के वाटा शिक्षण उपकराचा व १ टक्का वाटा आरोग्य उपकराचा असतो. या उपकरांतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २५ टक्के रक्कम आरोग्य खात्यासाठीच्या स्वतंत्र निधीत वळती केली जाईल. हा निधी प्रामुख्याने आयुषमान भारत, पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजना यावर खर्च केला जाईल. स्वतंत्र निधीमुळे जगातील आणखी अद्ययावत उपचार भारतात उपलब्ध होऊ शकतील. सध्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या (जीडीपी) फक्त १.४ टक्के रक्कम आरोग्य क्षेत्रावर खर्च होते. पण हे प्रमाण २०२४ उजाडेस्तोवर ४ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे.

नागरिकांना मोफत लस द्यावी -केजरीवालदेशभरातील नागरिकांना केंद्र सरकारने कोरोना लस मोफत द्यावी, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबत विनंती केली आहे. जर ते त्यास तयार झाले नाहीत तर दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करून देऊ, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. केजरीवाल म्हणाले, सर्वप्रथम आरोग्यसेवकांना ही लस दिली जाईल. केंद्र सरकार आणि शास्त्रज्ञांनी सर्वच टप्प्यांवरती काळजी घेत ही लस उपलब्ध केली आहे. केंद्र सरकार मोफत लसीबाबत कोणता निर्णय घेते ते कळेल. परंतु, केंद्राने ही बाब मान्य केली नाही तर आम्ही दिल्लीकरांचे मोफत लसीकरण करू, असे ते म्हणाले.

राजकीय नेत्यांना प्राधान्याने लस द्यापुडुचेरी : लोकांना विश्वास वाटण्यासाठी सर्व राजकीय नेते, मंत्री, खासदार यांना कोरोना लसीकरण मोहिमेत प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून केली आहे.ते म्हणाले, सर्व राजकीय नेत्यांनी ही लस घेतल्याचे पाहून सर्वसामान्य जनतेचाही आत्मविश्वास वाढेल. 

 

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधान