हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:38 IST2025-10-22T16:35:54+5:302025-10-22T16:38:33+5:30
एका आईने आपल्या १० वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला.

फोटो - tv9hindi
जगात कोणीही आईची बरोबरी करू शकत नाही. एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. एका आईने आपल्या १० वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला. मुलाचं लिव्हर ८० टक्के खराब झालं होतं. तिच्या मुलीचाही याच आजाराने मृत्यू झाला होता. मुलीसाठी आई काहीही करू शकली नाही. पण यावेळी तिने आपलं लिव्हर मुलाला दिलं, ज्यामुळे त्याला जीवनदान मिळालं.
जमुनिया गावात ही घटना घडली. तेजलाल सनोदिया येथे त्याच्या कुटुंबासह राहतात. ते शेतकरी आहे. त्यांना दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्याची मुलगी १० वर्षांची असतानाच तिचा मृत्यू झाला पावली. तेजलाल यांनी स्पष्ट केलें की त्यांच्या मुलीला पोटदुखीचा त्रास होता. उपचार केले, पण वेदना कमी झाल्या नाहीत. मग एके दिवशी अचानक तिचा मृत्यू झाला. नंतर कळलं की मुलीचं लिव्हर खराब झालं होतं..
१० वर्षांचा मुलगा शौर्यलाही गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्याच्या मुलाचा आजार मुलीसारखाच असल्याचं पाहून दिल्लीतील एम्समध्ये त्याला घेऊन गेले, जिथे चाचण्यांमधून असं दिसून आलं की शौर्यचं लिव्हर ८० टक्के खराब झालं. कोणाच्या तरी सल्ल्यानुसार, ते शौर्यला हैदराबाद येथील रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी ४० लाख रुपये खर्च असल्याचा अंदाज वर्तवला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. याच दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना दिल्लीतील नारायण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, जिथे सुरुवातीला २२ लाख रुपये खर्च सांगितला होता.
शौर्यची आई गीता सनोदिया तिचे लिव्हर दान करण्यासाठी पुढे आली. ती म्हणाली, "मी माझं लिव्हर माझ्या मुलाला देईन." यानंतर, डॉक्टरांनी यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लान्ट केलं. त्याच्या उपचारांसाठी अजूनही मोठा खर्च आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की जर लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आले तर त्यांच्या मुलाची प्रकृती लवकर सुधारेल. १५ लाख रुपये कर्ज घेतले असून सार्वजनिक मदतीद्वारे २० लाख रुपये जमा केले आहेत.