शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Corona Virus: शेअर बाजाराला कोरोनाचा डंख; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:55 IST

सलग सहावा दिवस; १४५० अंशांची घसरण; निफ्टीही गडगडला

मुंबई : जगातील अनेक देशांत कोरोनाचा झालेला संसर्ग, जगातील शेअर बाजारांत झालेली घसरण, परकीय वित्तसंस्थांकडून मोठी विक्री आणि मुडीजने घटविलेला जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज यांमुळे मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार घसरण झाली. बाजाराचा निर्देशांक सुमारे १४५० अंशांनी खाली आला. गेले सहा दिवस होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आतापर्यंत बाजारात आज झालेली घसरण दुसऱ्या क्रमांकाची आहे.बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स ७०० अंशांनी खाली येऊन ३९,०८७.४७ अंशांवर खुला झाला. त्यानंतर तो १५२५ अंशांपर्यंत खाली गेला. बाजार बंद होताना निर्देशांक ३८,२९७.४७ अंशांवर आला. गुरुवारच्या तुलनेमध्ये त्यात १४४८.३७ अंशांनी घट झाली. निफ्टीही ३.७१ टक्के म्हणजेच ४३१.५५ अंशांनी कमी होऊन ११,२०१.७५ वर बंद झाला. सलग सहाव्या दिवशी निर्देशांकांमध्ये घसरण झाली.मुडीजने घटविला अंदाजकोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसण्याची शक्यता आहे. मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा आगामी वर्षामध्ये २.८ ऐवजी २.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुडीजच्या या अंदाजाचाही जगभरातील शेअर बाजारांवर प्रतिकूल परिणाम झाला. यामुळे एकाच दिवसामध्ये गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.कोरोना विषाणूने आता जगालाच आपल्या कवेत घेण्यास प्रारंभ केल्याने जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीने आशियातील सर्वच शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण झाली.टोकिओ, सिडनी, सेऊल, बॅँकॉक आदी शेअर बाजारांमध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली. याआधी अमेरिका व युरोपमधील शेअर बाजारही घसरले. युरोपातील निर्देशांक चार टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :corona virusकोरोनाshare marketशेअर बाजार