शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील सामान्य रुग्णालयात 24 तासांत 9 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 08:24 IST

अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबादेतील सामान्य रुग्णालयात गेल्या 24 तासांत 9 लहानग्यांचा मृत्यू झाल्यानं गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबादेतील सामान्य रुग्णालयात गेल्या 24 तासांत 9 लहानग्यांचा मृत्यू झाल्यानं गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सर्व मुलांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालय प्रशासनानं लहानग्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.पाच लहानग्यांना बाहेरच्या रुग्णालयातून अहमदाबादेतल्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तर इतर चार मुलं येथेच जन्मली होती. मुलं शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त होती. तसेच त्यांना भयंकर आजारानं पछाडलं होतं, अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. दुसरीकडे या मुद्द्यावरून गुजरातमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं गुजरात सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारनं एकतर या घटनेला डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं मान्य करावं, अन्यथा मुलांच्या आई कुपोषित होत्या का ते सांगावं, असं ट्विट करत काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल यांनी गुजरात सरकारला लक्ष्य केलं आहे.चिमुकल्यांची प्रकृती जास्ती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. रुग्णालयाच्या वतीनं त्या बाळांना वाचवण्यासाठी सर्व उपाय योजण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचं विरोध प्रदर्शन करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयातील (पीडीएमसी) एका परिचारिकेने चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच तीन शिशुंचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाला होता. पोलिसांनी संबंधित परिचारिकेला अटक केली होती. तर चौथ्या बाळाला सेप्टिसेमिया झाल्याचा निष्कर्ष काढून त्याच्या मृत्यूचे प्रकरण पीडीएमसीने मिटविले होते. तथापि, या बाळाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते. वैद्यकीय अधीक्षक वसंत लवणकर यांच्या अध्यक्षतेत नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल दिला. ‘सेप्टिसेमिया’ने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पीडीएमसी प्रशासनाने काढल्यामुळे चौथ्या बाळाचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. इतर तीन बाळांचा मृत्यू चुकीच्या इंजेक्शनमुळे झाल्याचे चौकशी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. चौथ्या बाळाच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याकरिता शवविच्छेदन करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले. 

टॅग्स :Deathमृत्यू