ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता कालवश
By Admin | Updated: March 8, 2015 14:40 IST2015-03-08T14:40:02+5:302015-03-08T14:40:02+5:30
ष्ठ पत्रकार आणि आउटलूक मासिकाचे संपादक विनोद मेहता यांचे रविवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता कालवश
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - ज्येष्ठ पत्रकार आणि आउटलूक मासिकाचे संपादक विनोद मेहता यांचे रविवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मेहता यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह पत्रकारीता क्षेत्रातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
विनोद मेहता यांचा जन्म १९४२ मध्ये पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे झाला होता. विनोद मेहता तीन वर्षांचे असताना त्यांचे कुटुंबीय भारतात आले. लखनौमधून शिक्षण घेतल्यावर मेहता पत्रकारिता क्षेत्राकडे वळले. डेबोनियर, संडे ऑब्झर्व्हर, इंडियन पोस्ट, द इंडिपेंडेट, द पायोनियर अशा अनेक ख्यातनाम मासिकांच्या संपादकपदी त्यांनी काम केले. फेब्रुवारी २०१२ पर्यंत मेहता आऊटलूक मासिकाचे मुख्य संपादक होते. लखनौ बॉय हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध असून संजय गांधी व अभिनेत्री मीना कुमार यांच्यावर त्यांनी पुस्तकही लिहीले होते. मेहता यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. अनेक अवयव निकामी झाल्याने मेहता यांचे रविवारी सकाळी निधन झाले.