शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Vinod Dua : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, उद्या होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:56 PM

Vinod Dua : विनोद दुआ यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये दीर्घकाळ काम केले होते. 1996 मध्ये त्यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ (Vinod Dua) यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ हिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हिंदी पत्रकारितेतील बहुचर्चित नाव म्हणून विनोद दुवा यांच्याकडे पाहिले जाते. वक्तृत्व शैली, अचूक विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणी यामुळे आजही त्यांचे विश्लेषणात्मक कार्यक्रम आवर्जुन पाहिले जातात. विनोद दुआ यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये दीर्घकाळ काम केले होते. 1996 मध्ये त्यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. जून 2017 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मुंबई प्रेस क्लबतर्फे रेडइंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिल्ली विद्यापीठातून शिक्षणविनोद दुआ यांचे बालपण दिल्लीतील निर्वासित वसाहतींमध्ये गेले. त्यांचे आई-वडील 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर खैबर पख्तुनख्वा येथून आले होते. विनोद दुआ हे दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयातून इंग्रजी विषयात पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातूनच इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीही मिळवली.

अँकरिंगचा दीर्घ अनुभव 1975 मध्ये विनोद दुआ यांनी युवा कार्यक्रमासाठी अँकरिंग केले. त्याच वर्षी त्यांनी जवान तरंग या तरुणांसाठीच्या कार्यक्रमाचे अँकरिंग सुरू केले. विनोद दुआ यांनी प्रणय रॉय यांच्यासोबत 1984 मध्ये दूरदर्शनवर निवडणूक विश्लेषणचे अँकरिंग केले. तसेच, त्यांनी जनवाणीचे (पीपल्स व्हॉईस) सुद्धा अँकरिंग केले होते, हा कार्यक्रम 1985 मध्ये सामान्य लोकांना थेट मंत्र्यांना प्रश्न विचारण्याची संधी होती. हा शो अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होता.

याचबरोबर, विनोद दुआ यांनी 1992 मध्ये झी टीव्ही वाहिनीच्या चक्रव्यूह शोचे अँकरिंग केले होते. तसेच, विनोद दुआ हे दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'तसवीर-ए-हिंद' शोचे अँकर होते. मार्च 1998 मध्ये त्यांनी सोनी एंटरटेनमेंट चॅनलचा शो 'चुनाव चुनौती'चे अँकरिंग केले होते. ते 2000 ते 2003 यादरम्यान सहारा टीव्हीमध्ये अँकरिंग होते. विनोद दुआ यांनी एनडीटीव्ही इंडियाच्या जाइका इंडिया या कार्यक्रमाचे अँकरिंगही केले. नंतर त्यांनी द वायर हिंदीसाठी जन गण मन की बातचे सुद्धा अँकरिंग केले होते.

टॅग्स :Journalistपत्रकार