शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशमध्ये ज्येष्ठ स्वातंत्रसैनिकाचा केला जाहीर अपमान, गळ्यात घातला चपलांचा हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:26 IST

Bangladesh News: सत्तांतर झाल्यापासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. तसेच तथाकथित आंदोलकांकडून आता आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

सत्तांतर झाल्यापासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. तसेच तथाकथित आंदोलकांकडून आता आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. बांगलादेशमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असलेल्या अब्दुल हई कानू यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांचा जाहीर अपमान करण्यात आला.या घटनेचा व्हिडीओ माजी पंतप्रधान शेख हसिना यांचा अवामी लीग पक्षाने सोशल मीडियावर शेअर करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अवामी लीगने एक्सवर व्हिडीओ शेअर करून  लिहिले की, स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सेवा देणारे एक सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक अब्दुल हई कानू यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून  अपमानित करण्यात आलं आहे. १९७१ मधील स्वातंत्र्यविरोधी घटकांच्या सध्याच्या सहकाऱ्यांनी कोमिलामधील चौड्डाग्राम उपजिल्ह्यातील एक सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक असलेल्या कानू यांचं त्यांच्या घरामधून एका टोळक्याने अपहरण केलं, असा दावा अवामी लीगने केला.

अवामी लीगने पुढे लिहिले की, हे निंदनीय कृ्त्य केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नाही तर देशाच्या स्वातंत्र्याची मूल्ये आणि आमच्या मुक्तीसंग्रामातील नायकांच्या सन्मानावरील हल्ला आहे. आमच्या युद्धनायकांविरोधात अशा प्रकारची कृत्य सहन केली जाऊ शकत नाही. हा बांगलादेशची गरिमा आणि इतिहासावरील थेट हल्ला आहे. आपल्याला याविरोधात लढावं.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशCrime Newsगुन्हेगारी