बांगलादेशमध्ये ज्येष्ठ स्वातंत्रसैनिकाचा केला जाहीर अपमान, गळ्यात घातला चपलांचा हार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:26 IST2024-12-23T14:26:22+5:302024-12-23T14:26:39+5:30
Bangladesh News: सत्तांतर झाल्यापासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. तसेच तथाकथित आंदोलकांकडून आता आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

बांगलादेशमध्ये ज्येष्ठ स्वातंत्रसैनिकाचा केला जाहीर अपमान, गळ्यात घातला चपलांचा हार
सत्तांतर झाल्यापासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. तसेच तथाकथित आंदोलकांकडून आता आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. बांगलादेशमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असलेल्या अब्दुल हई कानू यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांचा जाहीर अपमान करण्यात आला.या घटनेचा व्हिडीओ माजी पंतप्रधान शेख हसिना यांचा अवामी लीग पक्षाने सोशल मीडियावर शेअर करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अवामी लीगने एक्सवर व्हिडीओ शेअर करून लिहिले की, स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सेवा देणारे एक सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक अब्दुल हई कानू यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून अपमानित करण्यात आलं आहे. १९७१ मधील स्वातंत्र्यविरोधी घटकांच्या सध्याच्या सहकाऱ्यांनी कोमिलामधील चौड्डाग्राम उपजिल्ह्यातील एक सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक असलेल्या कानू यांचं त्यांच्या घरामधून एका टोळक्याने अपहरण केलं, असा दावा अवामी लीगने केला.
अवामी लीगने पुढे लिहिले की, हे निंदनीय कृ्त्य केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नाही तर देशाच्या स्वातंत्र्याची मूल्ये आणि आमच्या मुक्तीसंग्रामातील नायकांच्या सन्मानावरील हल्ला आहे. आमच्या युद्धनायकांविरोधात अशा प्रकारची कृत्य सहन केली जाऊ शकत नाही. हा बांगलादेशची गरिमा आणि इतिहासावरील थेट हल्ला आहे. आपल्याला याविरोधात लढावं.