कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् राज्यसभेचे खासदार अहमद पटेल कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 19:10 IST2020-10-01T19:08:41+5:302020-10-01T19:10:50+5:30

ahmed patel corona positive राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Senior Congress leader and Rajya Sabha MP Ahmed Patel Corona positive | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् राज्यसभेचे खासदार अहमद पटेल कोरोना पॉझिटिव्ह

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् राज्यसभेचे खासदार अहमद पटेल कोरोना पॉझिटिव्ह

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी एका ट्विट करत ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: ला वेगळे करावे, असं आवाहन पटेल यांनी केले आहे.
राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे , 'तपासणीत मला कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अलीकडेच माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी स्वत: ला वेगळे करावे, असं आवाहन मी करतो. अहमद पटेल यांनी नुकत्याच संसदेच्या संपलेल्या पावसाळी अधिवेशनात भाग घेतला होता.

अहमद पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती कळताच कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश, मुकुल वासनिक, कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते आणि सध्या शिवसेना नेते प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Senior Congress leader and Rajya Sabha MP Ahmed Patel Corona positive