CoronaVirus: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भाची, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 04:04 PM2021-04-27T16:04:13+5:302021-04-27T16:07:47+5:30

CoronaVirus: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले.

senior congress leader and former pm atal bihari vajpayee niece karuna shukla passed away | CoronaVirus: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भाची, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन

CoronaVirus: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भाची, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला यांचे निधनमुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वाहिली श्रद्धांजलीमाजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची

रायपूर: कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. या कालावधीत अनेक दिग्गज मंडळी, नेते यांचे कोरोनामुळे निधन झाले. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. करुणा शुक्ला यांच्या निधनानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. (senior congress leader and former pm atal bihari vajpayee niece karuna shukla passed away)

गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगढच्या रामकृष्ण केअर या रुग्णालयात करुणा शुक्ला यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. करुणा शुक्ला यांचे निधन झाले. निष्ठूर कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावले. राजकारणापलीकडे आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे ट्विट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी करुणा शुक्ला यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना केले आहे. 

आताची स्थिती नॅशनल इमरजन्सी नाही का? लसींच्या किमतीवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले

भाजपने तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश

करुणा शुक्ला तब्बल तीन दशके तब्बल तीन दशके भाजपमध्ये होत्या. सन १९८३ मध्ये करुणा शुक्ला भाजपच्या तिकिटावर प्रथमच आमदार बनल्या. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे करुणा शुक्ला भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 

कोरोनाचा कहर! भारताच्या मदतीला अमेरिकेच्या कंपन्या; ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना 

विधानसभा निवडणुकी कडवी टक्कर

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते यांना २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत करुणा शुक्ला यांनी कडवी टक्कर दिली होती. राजनांदगांव मतदारसंघात ही लढत रंगली होती. या निवडणुकीत करुणा शुक्ला यांचा पराभव झाला असला तरी रमण सिंह यांना जिंकण्यासाठी बराच घाम गाळावा लागला.

Web Title: senior congress leader and former pm atal bihari vajpayee niece karuna shukla passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.