शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

2019 मध्ये ज्येष्ठ भाजपा नेत्यांचे 'अच्छे दिन'; अमित शहांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 6:40 PM

ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपा नेतृत्त्वाचे प्रयत्न

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक भाजपामधील वरिष्ठ नेत्यांसाठी नवसंजीवनी ठरण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत अमित शहांनी अनौपचारिकपणे या गोष्टीचे संकेत दिले. त्याआधी भाजपानं वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांनी लोकसभेची निवडणूक लढवू नये, असा नियम आखला होता. त्यामुळे आधीच मार्गदर्शक मंडळात गेलेल्या वरिष्ठ नेत्यांना यापुढे लोकसभेतही जागा मिळणार नव्हती. मात्र या नियमात बदल करण्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे अडगळीत गेलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना 2019 मध्ये अच्छे दिन येऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये झालेल्या एच. डी. देवेगौडा यांच्या शपथविधीत सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले होते. यानंतर उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सर्व विरोधकांनी भाजपाविरोधात एकत्र येत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अमित शहांकडून सुरू आहे. त्यामुळेच 75 वर्ष पूर्ण केलेल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं, असे संकेत शहांनी दिले. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शत्रुघ्न सिन्हा, करिया मुंडा आणि सुमित्रा महाजन यांच्यासारख्यांना वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळेल. गेल्या आठवड्यात देशभरातील 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये लोकसभेच्या 2 आणि विधानसभेची 1 जागा सोडल्यास इतर सर्वच ठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला. कैराना लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपानं प्रतिष्ठेची केली होती. भाजपा नेते हुकूम सिंह यांच्या निधनानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजपानं त्यांच्या मुलीला मैदानात उतरवलं होतं. मात्र सहानुभूतीची मतं मिळूनही विरोधकांच्या एकजुटीपुढे भाजपाचा निभाव लागला नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्याचे संकेत शहांनी दिले आहेत. 

टॅग्स :LoksabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी